Pebble Smartwatch Sakal
विज्ञान-तंत्र

Pebble Smartwatch: Apple Watch सारखी दिसणारी भन्नाट स्मार्टवॉच लाँच, किंमत फक्त २ हजार रुपये; पाहा फीचर्स

Pebble ने आपली नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच केली आहे. या वॉचची किंमत २ हजार रुपयांपेक्षा कमी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pebble Frost Smartwatch Launched: Pebble सातत्याने भारतीय बाजारात आपल्या स्मार्टवॉचला लाँच करत आहे. आता कंपनीने लाइनअपचा विस्तार करत Pebble Frost स्मार्टवॉचला लाँच केले आहे. या वॉचचे डिझाइन Apple Watch सारखे आहे. वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट, १.८७ इंच टच स्क्रीन दिली आहे. याशिवाय, ब्लड ऑक्सिजन ट्रॅकर आणि हार्ट रेट ट्रॅकर सारखे हेल्थ फीचर्स देखील यात तुम्हाला मिळतील. या वॉचची किंमत २ हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

हेही वाचा- Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

Pebble Frost smartwatch ची किंमत

Pebble Frost smartwatch ला कंपनीने फक्त १,९९९ रुपये किंमतीत भारतात लाँच केले आहे. या वॉचला तुम्ही ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. वॉचला ब्लॅक, ब्लू, ग्रे आणि ऑरेंज रंगात खरेदी करू शकता. ही वॉच Boat, Noise आणि Fire-Boltt ला टक्कर देईल.

Pebble Frost चे स्पेसिफिकेशन्स

Pebble Frost चे डिझाइन काहीप्रमाणात Apple Watch सारखे आहे. याच्या उजव्या बाजूला क्राउन आणि बटन देण्यात आले आहे. वॉच १.८७ इंच आयपीएस टच स्क्रीन आणि ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टसह येते. यात १०० पेक्षा अधिक वॉच फेसचा सपोर्ट मिळतो. डिव्हाइसला माती आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी आयपी६७ रेटिंग मिळाले आहे. यात फिटनेस आणि हेल्थसाठी देखील अनेक फीचर्स पाहायला मिळतात. हार्ट रेट मॉनिटर, ब्लड ऑक्सिजन सेंसर आणि स्टेप-स्लीप ट्रॅकर सारखे हेल्थ फीचर्स मिळतील. तसेच, वॉचवरच स्मार्टफोनचे नॉटिफिकेशन पाहू शकता.

Pebble च्या या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगचा सपोर्ट दिला आहे. त्यामुळे तुम्ही थेट घड्याळावरूनच कॉल करू शकता. कॉलिंगसाठी मायक्रोफोन आणि स्पीकर दिले आहे. याशिवाय, कॅलेंडर, कॅमेरा कंट्रोल, कॅलक्यूलेटर आणि म्यूझिक कंट्रोल सारखे इतर फीचर्स देखील मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला! नाशिकची धुरा महाजनांकडे, तर गोगावलेंची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती

Mira-Bhayandar Metro: अनर्थ टळला! स्कूल बस पुढे गेली अन् मीरा-भाईंदर मेट्रो कामादरम्यान स्लॅब कोसळला; VIDEO VIRAL

CSK New Coach: "आधी, MS Dhoni ची संघातील भूमिका काय ते निश्चित करा अन् मग कोच शोधा"; CSK ला दिग्गजाकडून स्पष्ट सल्ला

सचिन पिळगावकरांसोबत अफेअरच्या चर्चा; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं सत्य; म्हणाली- आम्ही एकमेकांना खूप...

Money Horoscope: हातात पैसा अन् नशिबात राजयोग! १८ ऑगस्टनंतर राशींचे दिवस पालटणार, नशिबाची पेटी उघडणार अन् पैशांचा पाऊस पडणार!

SCROLL FOR NEXT