विज्ञान-तंत्र

सॅमसंगचे दोन नवीन फोल्डेबल फोन लॉंच; किंमत, फीचर्स जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Samsung Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Flip 4 फोल्डेबल स्मार्टफोन अधिकृतपणे लॉन्च करण्यात आले आहेत. नवीन Galaxy Fold स्मार्टफोनमध्ये कोणतेही मोठे अपग्रेड केले नाही, परंतु प्रोसेसर आणि कॅमेरा सेक्शनमध्ये काही चांगले बदल केले आहेत. चला तर मग सॅमसंगच्या या फोल्डेबल फोन्समध्ये काय खास फीचर्स देण्यात आलेत...

Samsung Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Flip 4 किंमती

Samsung Galaxy Z Fold 4 जागतिक स्तरावर $1,799 (रु. 1,42,000) लाँच करण्यात आला आहे. दुसरीकडे, Samsung Galaxy Z Flip 4 ची किंमत $999 (रु. 80,000) पासून सुरू होते. मात्र, भारतातील किंमत अद्याप जाहीर झालेली नाही. गॅलेक्सी Z फ्लिप बोरा पर्पल, ग्रेफाइट, पिंक गोल्ड आणि ब्लू रंगांमध्ये उपलब्ध आहे. यासोबतच ग्राहकांना पुन्हा एकदा स्मार्टफोनची बेस्पोक आवृत्ती पाहायला मिळणार आहे.

Samsung Galaxy Z Fold 4 चे स्पेसिफीकेशन्स

Z Fold 4 जुन्या जनरेशन Galaxy Z Fold 3 सारखा दिसतो. हे स्नॅपड्रॅगन 8+ जनरल 1 प्रोसेसरसह येतो. यात 6.2-इंचाचा HD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले (2316 x 904 पिक्सेल) अ‍ॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेटसह देण्यात आले आहे. त्याच्या अनफोल्डेड फॉर्ममध्ये, वापरकर्त्यांना 2176x1812 पिक्सेल रिझोल्यूशनसह 7.6-इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X इन्फिनिटी फ्लेक्स डिस्प्ले मिळतो.

Galaxy Z Fold 4 वरील कॅमेऱ्यांमध्ये OIS सह 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 30X डिजिटल झूमसह 10-मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,440mAh बॅटरी युनिट दिले आहे.

सॅमसंग गॅलेक्सी फ्लिप 4 चे स्पेसिफीकेशन्स

Samsung Galaxy Flip 4 ची बॉडी खूपच लहान आहे आणि बाहेर नोटीफिकेशनसाठी 1.9-इंच स्क्रीन दिली आहे. यावेळी सॅमसंगने पोर्ट्रेट मोडसाठी सपोर्टही दिला आहे. त्याच्या अनफोल्डेड फॉर्ममध्ये त्याला 1Hz ते 120Hz च्या अडेप्टीव्ह रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले मिळतो.

Flip 4 मध्ये देखील तुम्हाला Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनच्या बाहेर दोन 12-मेगापिक्सेल कॅमेरे उपलब्ध आहेत. आत, सेल्फीसाठी 10-मेगापिक्सेल शूटर आहे. तसेच यामध्ये 3,700mAh ची बॅटरी देखील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT