विज्ञान-तंत्र

बुलेट खरेदीचं स्वप्न होणार पूर्ण; आता घेता येणार ४० हजारांच्या आता

सकाळवृत्तसेवा

दिसायला दमदार, रुबाबदार आणि तो खास आवाज असलेला बुलेट आपल्या दारात असावी असं प्रत्येक तरुणाला वाटत असतं. मात्र, सध्याच्या काळात या बुलेटची खरेदी करणं सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारं नाही. कारण, या गाड्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. स्वस्तातील बुलेट जरी घ्यायचं ठरवल. तरीदेखील, लाख-दोन लाख रुपयांची रक्कम तुमच्याकडे असायलाच हवी. त्यामुळे अनेकांचं बुलेट घेण्याचं स्वप्न अपूर्ण राहतं. परंतु, कमी बजेटमध्ये बुलेट खरेदी करण्याचं तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकतं. कारण, केवळ ४० हजार रुपयांमध्ये तुम्ही आता बुलेट खरेदी करु शकता.  

आपल्या दारापुढे रॉयल एन्फिल्ड ही रुबाबदार बुलेट उभी असावी असं अनेकांचं स्वप्न असतं. विशेष म्हणजे हे स्वप्न ओएलएक्सच्या माध्यमातून पूर्ण करता येणार आहे. कारण, ओएलएक्सवर रॉयल एन्फिल्डची सेकंड हॅण्ड बुलेट विक्रीसाठी उपलब्ध आहे.  विशेष म्हणजे ही बुलेट केवळ ४० हजारांमध्ये उपलब्ध आहे. २००५ चं मॉडेल असलेली ही बुलेट ३० हजार किलोमीटर चालवण्यात आली असून ती 1983 military edition आहे. 

दरम्यान, रॉयल एन्फिल्डच्या दोन नव्या कोऱ्या बाईक्सदेखील नुकत्याच बाजारात दाखल झाल्या आहेत. Interceptor 650 आणि Continental GT 650 या नव्या कोऱ्या बाईक्स असून Interceptor 650 ची किंमत २ लाख,७५ हजार, ४६७ रुपये इतकी आहे. तर, रंगानुसार या बाईकची किंमत २ लाख, ८३ हजार, ५९३ रुपये आहे. त्याचसोबत  Continental GT 650 ची किंमत २ लाख ९१ हजार, ७०१ रुपये आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT