Social Media Sakal
विज्ञान-तंत्र

Social Media : इन्फ्लुएंसर्ससाठी केंद्राची नवी नियमावली; उल्लंघन केल्यास ५० लाखांचा दंड

सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन इन्फ्लुएंसर्सना करण्यात आले आहे.

निनाद कुलकर्णी

Centre Issues New Rules For Influencers : केंद्र सरकारकडून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्ससाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन इन्फ्लुएंसर्सना करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ५० लाखांचा दंड भरावा लागेल असे, केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत स्वतंत्र मीडियाच्या रूपाने सोशल मीडिया स्टार्स आणि रिपोर्टर्सची संख्या वाढली आहे. त्यात फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबर सशुल्क उत्त्पादनांचा प्रचार करण्याचे काम करतात. हे टाळण्यासाठी सरकारकडून ही नियमावली जारी करण्यात आली आहे.

काय आहेत सरकारचे नवे नियम?

केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाकडून सोशल मीडियासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

सोशल मीडियावर सशुल्क सामग्री पोस्ट करणे हे नियामांचे उल्लंघन असल्याचे केंद्राने म्हटले आहे. अशा प्रकारे सशुक्ल पोस्ट करणाऱ्यांना ५० लाखांचा दंड भरावा लागणार आहे.

सुरुवातीला दिशाभूल करणाऱ्या किंवा चुकीच्या पद्धतीने सशुल्क सामग्रीचा प्रचार केल्यास 10 लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्यास ५० लाखांपर्यंतचा दंड वसूल केला जाणार आहे.

नवीन नियमांनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणत्याही पेड आर्टिकलवर डिस्क्लेमर द्यावा लागणार आहे. दिशाभूल करणाऱ्या पोस्टपासून ग्राहकांचे रक्षण करण्यासाठी सरकारने ही नवीन नियमावली आणली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT