Tata CNG Automatic eSakal
विज्ञान-तंत्र

Tata CNG Automatic : टाटाने लाँच केली देशातील पहिली 'ऑटोमॅटिक सीएनजी' कार; जाणून घ्या मायलेज, फीचर्स अन् किंमत..

Tata CNG AMT : कंपनीने एंट्री लेव्हल हॅचबॅक असलेल्या टियागो आणि टिगॉर या सेडान कारच्या सीएनजी व्हर्जनमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिले आहेत.

Sudesh

Tata CNG Automatic Cars : टाटा कंपनीने भारतात पहिल्यांदाच सीएनजी इंधन प्रकारातील ऑटोमॅटिक कार्स लाँच केल्या आहेत. कंपनीने एंट्री लेव्हल हॅचबॅक असलेल्या टियागो आणि टिगॉर या सेडान कारच्या सीएनजी व्हर्जनमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिले आहेत.

Tiago CNG AMT आणि Tigor CNG AMT या दोन्ही कारमध्ये 28.06 किलोमीटर प्रति लीटर मायलेज मिळतं असा दावा कंपनीने केला आहे. दोन्ही गाड्यांमध्ये कंपनीने नवे कलर ऑप्शनही उपलब्ध करून दिले आहेत. टाटाच्या या सीएनजी रेंजची किंमत 7.89 लाख रुपयांपासून सुरू होते. (Tata Automatic CNG Cars)

टियागो कारच्या ऑटोमॅटिक सीएनजी (Tata Tiago CNG Automatic) व्हेरियंटची किंमत 7,89,900 रुपयांपासून सुरू होते. यामध्ये चार ट्रिम सादर करण्यात आले आहेत. याच्या टॉप XZA NRG या ट्रिमची किंमत 8,79,900 एवढी आहे. तर टिगॉर ऑटोमॅटिक सीएनजी कारचे दोन व्हेरियंट उपलब्ध केले आहेत. याच्या बेस व्हेरियंटची किंमत 8,84,900 रुपये आहे, तर टॉप व्हेरियंटची किंमत 9,54,900 रुपये आहे. (Tata Tigor CNG Automatic)

सीएनजीची मागणी वाढली

टाटाचे मुख्य व्यावसायिक अधिकारी अमित कामत यावेळी म्हणाले, की सीएनजी प्रकारातील मोटारींची मागणी वाढत आहे. गेल्या 24 महिन्यांमध्ये आम्ही 1.3 लाखांहून अधिक सीएनजी कार्स विकल्या आहेत. टियागो, टिगोर, अल्ट्रॉज आणि पंच या कार्स सीएनजी पर्यायात उपलब्ध आहेत. सीएनजी कारच्या विक्रीत कंपनीने 67.9 टक्क्यांची वाढ झाली आहे. आता या नव्या ऑटोमॅटिक रेंजमुळे मागणीत आणखी वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT