HIV Treatment sakal
विज्ञान-तंत्र

HIV Treatment : एचआयव्ही उपचारांत महत्त्वाचे पाऊल ; ‘क्रिस्पर’चा वापर करून विषाणू बाहेर काढता येणार

‘एचआयव्ही’वर उपचार शोधण्याच्या प्रयत्नांत संशोधकांनी एक मोठे यश प्राप्त केले आहे. गुणसूत्रांच्या जागेमध्ये बदल करू शकणाऱ्या ‘क्लस्टर्ड रेग्युलर्ली इंटरस्पेस्ड शॉर्ट पॅलिन्ड्रॉमिक रिपिट्‌स’ (क्रिस्पर) या उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून बाधित पेशीपासून ‘एचआयव्ही’चा डीएनए तोडून टाकता येणे शक्य असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

ॲमस्टरडॅम : ‘एचआयव्ही’वर उपचार शोधण्याच्या प्रयत्नांत संशोधकांनी एक मोठे यश प्राप्त केले आहे. गुणसूत्रांच्या जागेमध्ये बदल करू शकणाऱ्या ‘क्लस्टर्ड रेग्युलर्ली इंटरस्पेस्ड शॉर्ट पॅलिन्ड्रॉमिक रिपिट्‌स’ (क्रिस्पर) या उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून बाधित पेशीपासून ‘एचआयव्ही’चा डीएनए तोडून टाकता येणे शक्य असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

या उपचारात ‘क्रिस्पर’ तंत्रज्ञानाचा वापर एखाद्या कात्रीसारखा केला जातो. या उपचारांमुळे ‘एचआयव्ही’ पूर्ण बरा होणार नसला तरी विषाणू शरीरातून काढता येणे शक्य आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे. नेदरलँडमधील ॲमस्टरडॅम विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत अभ्यास करून आपला अहवाल वैद्यकीय परिषदेसमोर सादर केला आहे.

हे संशोधन प्राथमिक अवस्थेत असून ‘एचआयव्ही पूर्ण बरा करण्याचा उपाय सापडला’ असा याचा अर्थ लावला जाऊ नये, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. प्रभावशाली पद्धती या प्रयोगाची सुरक्षिततता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी आणखी संशोधन आणि प्रयोग करणे बाकी असल्याचे अहवालात म्हटले आहे. ‘‘हा अत्यंत लक्षवेधक अभ्यास आहे.

एचआयव्हीच्या विषाणूने शरीरात प्रवेश केल्यास तो बाधित पेशीमध्येही आपले अस्तित्व कायम राखतो. नव्या तंत्रज्ञानामुळे त्याचे हे वैशिष्ट्यच दूर करता येणार आहे. ही उपचारपद्धती प्रभावशाली आणि उपकारक असल्याचे सिद्ध करण्यासाठी आणखी काही प्रयोग आवश्‍यक आहे,’’ असे या विषयातील तज्ज्ञ डॉ. जेम्स डिक्सन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT