Tinder New Feature eSakal
विज्ञान-तंत्र

Tinder : टिंडरवर प्रोफाईल उघडलंय, मात्र बोलणं सुरू करता येत नाही? 'हे' खास फीचर येईल कामी

Dating Apps : बम्बल आणि हिंज अशा डेटिंग अ‍ॅप्सवर प्रोफाईल प्रॉम्प्ट हे फीचर आधीपासूनच उपलब्ध आहे.

Sudesh

Tinder New Feature : प्रसिद्ध डेटिंग अ‍ॅप असणाऱ्या टिंडरवर आता एक खास फीचर देण्यात येणार आहे. यूजर्सना आपल्या प्रोफाईलवर आता क्विझ, इनफॉर्मेशन टॅग आणि प्रोफाईल प्रॉम्प्ट असे फीचर्स जोडता येणार आहेत. यामुळे आता यूजर्सना एकमेकांशी बोलणं सुरू करणं आणखी सोपं होणार आहे.

बम्बल आणि हिंज अशा डेटिंग अ‍ॅप्सवर प्रोफाईल प्रॉम्प्ट हे फीचर आधीपासूनच उपलब्ध आहे. यामुळे यूजर्सना आपल्या प्रोफाईलमध्येच एखादा प्रश्न किंवा स्वतःबद्दल काही माहिती अ‍ॅड करता येणार आहे. याला बाकी यूजर्स रिप्लाय करू शकतील. (Tinder Profile Prompt Reply)

'की टू माय हार्ट इज..', 'फर्स्ट थिंग इन माय बकेट लिस्ट..', 'परफेक्ट फर्स्ट डेट..' असे काही प्रॉम्प्ट तुम्ही आपल्या प्रोफाईलवर लिहू शकता. यांना रिप्लाय करून एखादी व्यक्ती तुमच्याशी संवाद सुरू करू शकेल. तसंच तुम्हीदेखील एखाद्या व्यक्तीच्या प्रोफाईल प्रॉम्प्टला रिप्लाय देऊन संवादाची सुरुवात करू शकता.

आणखी नवे फीचर्स

आपल्या प्रोफाईलमध्ये यूजर्स क्विझ किंवा स्वतःबद्दल माहिती देखील जोडू शकतील. यामुळे तुमची प्रोफाईल अगदी इंट्रेस्टिंग होईल, आणि अधिकाधिक यूजर्स तुमच्याशी संवाद सुरू करतील. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींचा उल्लेख प्रोफाईलमध्ये केल्यामुळे सारखी आवड असणाऱ्या व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधू शकणार आहेत.

यूआयमध्ये बदल

टिंडर आपल्या यूआयमध्ये देखील बदल करत आहे. नवीन अ‍ॅनिमेशन आणि डार्क मोड असे फीचर्स कंपनीने आपल्या अ‍ॅपमध्ये लाँच केलं आहे. यासोबतच कंपनीने यापूर्वीच मॅच-मेकर नावाचं एक फीचरही दिलं आहे, ज्यामुळे तुमचे मित्र तुम्हाला इतरांना रेकमेंड करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: 'कोणाचा बाप आला तरी जमिनी देणार नाही’; शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, मोजणीच्या नोटिसींची होळी

Eknath Shinde Vishakha Raut : ‘पद वाचवा, २० नगरसेवक फोडते’; विशाखा राऊत यांचा एकनाथ शिंदेंना प्रस्ताव? समाधान सरवणकरांचा धक्कादायक दावा

Pune Railway: पुणे-हडपसर दरम्यान तिसरी रेल्वे मार्गिका सज्ज; वाहतुकीतील क्रॉसिंगचा अडथळा दूर; प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत

Singer Nisar Vaynad : उदित नारायण यांची ‘कार्बन कॉपी’! प्रसिद्ध गायकाचे वयाच्या ४४व्या वर्षी निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटलांवर मध्यरात्री उपचार, सलाइन लावले

SCROLL FOR NEXT