MIB Twitter Account Hacked Sakal
विज्ञान-तंत्र

Twitter वर शब्दमर्यादा वाढणार! सविस्तर लिहिता येणार पोस्ट

कंपनीकडून या फिचरची चाचणी सध्या सुरू असून ते लवकरच सूरू होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

ट्विटरवर आता युजर्सना मोठे लेख पोस्ट करता येणार आहेत. सध्या ट्विटर यासाठी एका नव्या फीचरवर (Twitter) काम करत असून २८० पेक्षा जास्त कॅरेक्टर ट्विट करता येणार आहेत. कंपनीकडून या फिचरची चाचणी सध्या सुरू असून ते लवकरच ट्विटरवर सूरू होणार आहे. त्यामुळे आता युजर्सना (Users) मोठे लेख लिहिणे सोपे होणार आहे.

असे करेल काम

मिळालेल्या माहितीनुसार मायक्रो-ब्लॉगिंग साईट ट्विटरचे हे फीचर त्याचा सर्वात मोठा अडथळा दूर करेल. त्यामुळे आता हे फीचर ट्विटर आर्टिकलमध्ये युजर्सना मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला तेथे जाऊन मोठा लेखही लिहता येणार आहे. तिथे लिहिताना कोणत्याही प्रकारची शब्द मर्यादा दिसणार नाही. तुम्ही 280 शब्दांपेक्षा जास्त शब्दांचे ट्विट करू शकाल. लेख लिहून झाल्यानंतर, तुम्हाला पूर्वीप्रमाणेच ट्विटवर क्लिक करून लेख पोस्ट करावा लागेल.

स्पर्धेत टिकण्यासाठी प्रयत्न

फेसबुक (Facebook) आणि रेडिट (Reddit) प्लॅटफॉर्मवरती युजर्सना पोस्ट लिहीण्यासाठी कोणत्याही शब्दमर्यादा नाहीत. पण ट्विटरवर ते शक्य नव्हते. त्यामुळे ट्विटरवरही दबाव होता. तसेच ट्विटर युजर्सना लांब पोस्टची इमेज किंवा स्क्रीनशॉट बनवून तो अटॅच करून पोस्ट करावा लागत होता. त्यामुळे आता या बदलामुळे युजर्सना मोठे लेख पोस्ट करता येणार आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT