Ashwini Vaishnaw on Deepfake eSakal
विज्ञान-तंत्र

Deepfake : दहा दिवसांत बसणार 'डीपफेक'ला वचक, मोदी सरकार बनवणार नियमावली; केंद्रीय मंत्री वैष्णव यांची घोषणा

Modi Govt on Deepfake : डीपफेकचा धोका लक्षात घेता, त्याबाबत कारवाई करण्याच्या दृष्टीने केंद्राने एक मोठी बैठक बोलावली होती.

Sudesh

Ashwini Vaishnaw on Deepfake : डीपफेकचा धोका लक्षात घेता, त्याबाबत कारवाई करण्याच्या दृष्टीने केंद्राने एक मोठी बैठक बोलावली होती. या बैठकीला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि प्रमुख सोशल मीडिया कंपन्या उपस्थित होत्या. डीपफेक बाबत केंद्र सरकार नियमावली तयार करणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यासाठी कंपन्या केंद्राची मदत करणार आहेत, अशी माहिती वैष्णव यांनी दिली.

"डीपफेक म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, तर समाजासाठी निर्माण झालेला एक मोठा धोका आहे. याबाबत सरकार आणि सर्व सोशल मीडिया कंपन्यांचं मत सारखंच आहे. यामुळेच डीपफेकवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लागू करण्याची गरज या कंपन्यांनी देखील मान्य केली आहे." असं वैष्णव यावेळी म्हणाले.

दहा दिवसांत अ‍ॅक्शन प्लॅन

ते पुढे म्हणाले, "पुढील दहा दिवसांमध्ये स्पष्ट अशा गाईडलाईन्स किंवा नियमावली तयार करण्याबाबत सर्वांनी सहमती दर्शवली आहे. गाईडलाईन्स तयार करण्याबाबत आजपासूनच काम सुरू होणार आहे. अगदी थोड्या कालावधीमध्येच डीपफेकवर ठोस उपाययोजना करण्यात येईल."

डीपफेक प्रकरण

काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदाना, कॅटरिना कैफ, काजोल अशा बॉलिवूड अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. यानंतर डीपफेक तंत्रज्ञानाबाबत सर्वच स्तरातून भिती व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी देखील याचा उल्लेख केला होता. सरकारने असे डीपफेक व्हिडिओ हटवण्याबाबत सोशल मीडिया कंपन्यांना निर्देश दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT