airtel  sakal
विज्ञान-तंत्र

Airtel Recharge: अवघ्या 11 रुपयांमध्ये वापरा अनलिमिटेड डाटा; 100 रुपयांपेक्षा स्वस्त आहे 'हा' रिचार्ज प्लान

Airtel Company giving three offers that come in under 100 rupees: तुमच्याकडे सुद्धा एअरटेल कंपनीचा प्रीपेड नंबर असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

सकाळ डिजिटल टीम

तुमच्याकडे सुद्धा एअरटेल कंपनीचा प्रीपेड नंबर असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. एअरटेल कंपनी 100 रुपयांमध्ये येणारे तीन ऑफर्स देत आहेत तर जाणून घेऊया असे कोणते तीन प्लान्स आहेत जे वापरकर्त्यांसाठी अनलिमिटेड ऑफर देतील.

भारतातील टेलीकॉम कंपन्यांनी वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. फक्त एअरटेल नव्हे तर रिलायन्स जिओ आणि वोडाफोन आइडिया म्हणजेच VI यांनी सुद्दा आपल्या रिचार्जच्या किंमती वाढवल्या आहेत. महागड्या रिचार्ज प्लान्सला ग्राहक त्रस्त झाले आहेत, अशातच आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत असे कोणते परवडण्याजोगे प्लान्स उपलब्ध आहेत जे 100 रुपयांमध्ये अनलिमिटेड सेवा देत आहेत.

एअरटेल कंपनी 100 रुपयांमध्ये तीन प्लान्स देत आहेत जाणून घेऊया सविस्तर की, काय आणि कशा सुविधा उपलब्ध आहेत,

  • एअरटेल 11 प्लान

11 रुपयांच्या ह्या प्लानसोबत कंपनी वापरकर्त्याला हाय स्पीड डेटा देत आहे. ह्या प्लानबरोबर वापरकर्त्यांना एका तासाची वैधता मिळते. परंतु, हा प्लान 10 जीबी एफयूपी लिमीट सोबत येतो म्हणजेच, 10 जीबी डाटाचा स्पीड कमी झाल्यावर तो 64 kbps होईल, ही गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे.

  • एअरटेल 49 प्लान

४९ रुपयांमध्ये एअरटेल प्रीपेड प्लान सोबत एअरटेल कडून तुम्हाला अनलिमिटेड हाय स्पीड डेटा मिळेल. ह्या प्लानबरोबर वापरकर्त्यांना एका तासाची वैधता मिळते. परंतु, हा प्लान 20 जीबी एफयूपी लिमीट सोबत येतो, म्हणजेच 20 जीबी डेटाचा स्पीड कमी झाल्यावर तो 64 kbps होईल.

  • एअरटेल 99 प्लान

2 दिवसाच्या वैधतेसाठी असणाऱ्या या रिचार्ज प्लानसाठी अनलिमिटेड हाय स्पीड डेटा मिळेल. हा प्लान 20 जीबी एफयूपी लिमीट सोबत येतो, म्हणजेच 20 जीबी डेटाचा स्पीड कमी झाल्यावर तो 64 kbps होईल ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.

लक्षात घ्या...

वरती दिल्या गेलेल्या तीन रिचार्ज डेटा प्लानचा तुम्ही अनलिमिटेड हाय स्पीड डेटाची ऑफर घेऊ शकता. 11 रुपये, 49 रुपये आणि 99 रुपयांच्या ह्या प्लान्सचा फायदा तेव्हाच घेऊ शकता जेव्हा तुमच्या नंबरवर आधीपासूनच अनलिमिटेड डेटा प्लान सुरू असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT