Aditya L1 Mission eSakal
विज्ञान-तंत्र

Aditya L1 Mission : लॅग्रेंज पॉइंट काय असतात? 'आदित्य'साठी या पॉइंटवर पोहोचणं का गरजेचं आहे? जाणून घ्या

ISRO Sun Mission : L1 पॉइंटच्या भोवती असणाऱ्या थ्री-डायमेंशनल हेलो ऑर्बिटमध्ये 'आदित्य'ला ठेवलं जाईल.

Sudesh

भारताची पहिली सौरमोहीम आता काही तासांमध्येच पार पडणार आहे. आदित्य एल-1 च्या लाँचिंगचं काउंटडाऊन सुरू झालं आहे. शनिवारी (2 सप्टेंबर) सकाळी 11:50 वाजता इस्रोचं पीएसएलव्ही रॉकेट 'आदित्य'सोबत अंतराळात झेप घेईल.

यानंतर सुमारे चार महिने प्रवास करुन हा उपग्रह पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर जाईल. याठिकाणी असलेल्या एका लॅग्रेंज पॉइंटच्या हेलो कक्षेत हा उपग्रह प्रस्थापित करण्यात येईल. हे लॅग्रेंज पॉइंट काय असतात? आणि आदित्य उपग्रह याच ठिकाणी का ठेवण्यात येणार आहे? असे प्रश्न कित्येकांना पडत आहेत.

लॅग्रेंज पॉइंट काय असतात?

लॅग्रेंज पॉइंट हे अंतराळातील अशा जागा असतात, ज्याठिकाणी एखादी वस्तू ठेवल्यास; ती वस्तू तिथेच कायम राहते. किंवा, ती वस्तू स्थिर ठेवण्यासाठी अगदी कमी बल किंवा उर्जेची गरज भासते. याला कारण म्हणजे, याठिकाणी सूर्याचं गुरुत्वाकर्षण बल आणि त्या पॉइंटजवळ असणाऱ्या दुसऱ्या मोठ्या वस्तूचं गुरुत्वाकर्षण बल हे काही प्रमाणात बॅलन्स होतं.

सूर्याभोवती असणारे लॅग्रेंज पॉइंट्स

इटॅलियन-फ्रेंच गणिततज्ज्ञ जोसेफी-लुईस लॅग्रेंज यांनी याचा शोध लावला होता. त्यांच्या स्मरणार्थ या पॉइंट्सना लॅग्रेंज असं नाव देण्यात आलं आहे. अंतराळात अशा प्रकारचे पाच पॉइंट आहेत. यातील तीन पॉइंट L1, L2 आणि L3 हे अस्थिर पॉइंट्स आहेत. तर, L4 आणि L5 हे पॉइंट्स स्थिर आहेत.

यातील एल-1 हा पॉइंट सूर्याच्या वाटेवर आहे. या ठिकाणाहून सूर्याचं विना-अडथळा निरीक्षण करता येतं. सध्या याठिकाणी सोलार अँड हेलिओस्फेरिक ऑब्जर्वेटरी सॅटेलाईट म्हणजेच SOHO प्रस्थापित आहे. L2 हा लॅग्रेंज पॉइंट पृथ्वीच्या मागच्या बाजूला आहे. याठिकाणाहून सूर्याचं सातत्याने निरीक्षण शक्य नाही. एल-3 हा लॅग्रेंज पॉइंट हा सूर्याच्याही मागच्या बाजूला आहे. तर L4 आणि L5 हे एका विशिष्ट कोनात असणारे स्थिर लॅग्रेंज पॉइंट्स आहेत.

L1 ची निवड का?

'आदित्य' उपग्रह ठेवण्यासाठी L1 पॉइंटची निवड करण्यामागे विविध कारणं आहेत. या ठिकाणाहून सूर्याचं सातत्याने निरीक्षण करणं शक्य आहे. कारण, इथून सूर्यापर्यंत मध्ये कोणतीच मोठी गोष्ट येत नाही. तसंच, पृथ्वीवर ज्याप्रमाणे 12 तास प्रकाश आणि 12 तास अंधार असतो, तसाही काही अडथळा इथे नाही. इथून 24x7 सूर्याचा अभ्यास करणं शक्य आहे.

या पॉइंटच्या भोवती असणाऱ्या थ्री-डायमेंशनल हेलो ऑर्बिटमध्ये 'आदित्य'ला ठेवलं जाईल. इथून तो आपल्या विविध उपकरणांच्या माध्यमातून सूर्याचं निरीक्षण आणि अभ्यास करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: महाराष्ट्रात टॅक्सी-ऑटो चालकांना मराठी बोलणे अनिवार्य! प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा; प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्याचे आदेश

अखेर भूषण प्रधानची स्वप्नसुंदरी समोर आलीच! कोण आहे ती? खास पोस्ट करत दाखवला चेहरा

Danoli Village Shutdown Protest : “भरतेशला न्याय मिळालाच पाहिजे”, दानोळी गाव बेमुदत बंद; जिवाभावाचा भरतेश गेला भविष्य सुरक्षितेसाठी गाव एकवटलं

छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहगर्जना घुमणार... ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित!

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT