What is e-PAN card Apply Online and Download 
विज्ञान-तंत्र

'E-PAN Card' हवयं? अप्लाय केल्यानंतर ताबडतोब करा डाउनलोड

सुमित बागुल

PAN परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन कार्ड एक महत्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. तुमचा पगार इन्कम टॅक्सच्या सूट पेक्षा जास्त आहे तर तुमच्या जवळ पॅन कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. पॅन कार्ड (PAN Card) बनवण्यासाठी तुम्हाला ऑफिस मध्ये जाऊन अर्ज द्यावा लागत होता. (How to apply for PAN card) पण आता ऑनलाइन (Online Pan Card application) अर्ज दाखल केला जातो. आता ऑनलाइन अर्ज दाखल करणे आता आणखी सोपे झाले आहे. अर्ज केल्यानंतर अगदी काही मिनिटांमध्ये तुम्हाला पॅन कार्ड मिळते. अप्लाय केल्यानंतर ताबडतोब ई-पॅन डाउनलोड करता येते.

देशातली सर्वात मोठी संस्था केंद्रिय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ने ई-पॅन सुविधा सुरू केली होती. तुम्हीसुद्धा जर ई-पॅन साठी अप्लाय केले असेल तर तुम्हाला CBDT ई-मेल वर पॅन कार्डची सॉफ्ट कॉपी PDF फॉर्मेटमध्ये पाठवते. तुम्ही तुमच्या ई-मेल आयडी वरून PAN डाउनलोड करू शकता. सोबतच पॅन कार्ड हरवल्यास, फाटल्यास किंवा खराब झाल्यास ड्युप्लिकेट कार्डसाठी सुद्धा ई-पॅन डाऊनलोड करू शकता.

इन्स्टंट PAN कार्डसाठी अप्लाय कसे करायचे ?

  • सगळ्यात आधी इन्कम टॅक्स विभागाच्या ई-फायलिंग पोर्टल वर जा आणि 'Instant PAN through Aadhaar' सेक्शन मध्ये 'Quick Links' वर क्लिक करा.

  • त्यानंतर नव्या पेज वर 'Get New PAN' या ऑप्शनवर क्लिक करा.

  • नविन पॅन कार्डसाठी तुमचा आधार नंबर टाका आणि 'Captcha' कोड टाईप केला की तुमच्या आधारशी लिंक्ड मोबाइल नंबरवर 'OTP' जनरेट करा.

  • ओटीपीला प्रमाणित करा.

  • आधार डिटेल्स प्रमाणित करा.

  • पॅन कार्ड अ‍ॅप्लीकेशनसाठी ई-मेल आयडीलाही प्रमाणित करायचा ऑप्शन असेल.

  • आधार नंबर ई-केवायसी डेटाला यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) सोबत जोडला जाईल, त्यानंतर तुम्हाला इंस्टंट पॅन मिळेल. या संपूर्ण प्रक्रियेला 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही.

e-PAN कसे करायचे डाउनलोड ?

  • सगळ्यात आधी या वेबसाइटवर क्लिक करा.

  • https://www.pan.utiitsl.com/PAN/mainform.html

  • अर्जदार या बॉक्समध्ये स्वतंत्र अर्थात इन्डिविज्यूअल सिलेक्ट करा.

  • यानंतर सिलेक्ट द रिक्वायर्ड ऑप्शनमध्ये फिजिकल PAN कार्ड आणि ई-पॅन सिलेक्ट करून त्या खाली विचारली गेलेली माहिती भरा.

  • त्यानंतर खालील सबमिट बटनवर क्लिक करा.

  • पूर्ण फॉर्म भरल्यानंतर अधिकारी तुम्ही दिलेली माहिती चेक करतात.

  • थोड्याच वेळात ई मेल आयडीवर पीडीएफ फॉर्मेट मध्ये ई-पॅन मिळेल.

फ्री आणि पेपरलेस प्रोसेस

नवे PAN कार्ड मिळवण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया अगदी सोपी, फ्री आणि पेपरलेस आहे. यात तुम्हाला पोर्टलवर कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे ही सुविधा फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे आधीपासून पॅन कार्ड नाही आहे, तसेच ज्यांचा मोबाइल नंबर आधार नंबरशी लिंक आहे आणि आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख दिली आहे. सोबतच ई-पॅन ही सुविधा अल्पवयीन मुलांसाठी नाही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT