AI Boyfriend eSakal
विज्ञान-तंत्र

AI Boyfriend : 'गप्पा मारुन थकत नाही, समजूनही घेतो..'; मुली देतायत तरुणांपेक्षा एआय बॉयफ्रेंडला पसंती

Relationship with Chatbot : खऱ्या आयुष्यात एक आयडियल बॉयफ्रेंड शोधणं खूपच अवघड आहे. सर्व लोकांचे स्वभाव वेगवेगळे असतात, त्यामुळे बऱ्याच वेळा वाद होऊ शकतात. मात्र, एआय बॉयफ्रेंडसोबत असं होत नाही.

Sudesh

AI Chatbot Partner : एआयमुळे आपल्या नोकऱ्या जाणार ही भीती कित्येक दिवसांपासून व्यक्त केली जात आहे. मात्र, एआय केवळ नोकरीच नाही, तर छोकरीही घेउन जात असल्याचं चित्र चीनमध्ये दिसून येतंय. याठिकाणी कित्येक तरुणी पार्टनर म्हणून तरुणांऐवजी एआयला पसंती देत आहेत. याला कारण म्हणजे, एआय बॉट्स त्यांना अगदी तशीच वागणूक देत आहेत जशी ते आपल्या जोडीदाराकडून अपेक्षा करतात.

चीनमधील टुफेई नावाच्या एका तरुणीने आपला अनुभव शेअर केला आहे. ग्लो (Glow App) नावाच्या अ‍ॅपवर तिला हा चॅटबॉट बॉयफ्रेंड मिळाला. शांघायमधील मिनिमॅक्स या स्टार्टअप कंपनीने हे अ‍ॅप तयार केलं आहे. विशेष म्हणजे, हे अ‍ॅप अगदी मोफत आहे. चीनमध्ये हजारो तरुण-तरुणींनी हे अ‍ॅप डाऊनलोड केलं आहे. (AI boyfriend App)

महिलांच्या भावना ओळखतो..

टुफेई सांगते, की तिच्या एआय बॉयफ्रेंडला महिलांशी कसं बोलायचं याची जाणीव आहे. खऱ्या तरुणांपेक्षा चांगल्या प्रकारे तो संवाद साधू शकतो. हा एआय बॉयफ्रेंड सहानुभूती देतो, तासन् तास गप्पा मारतो. मला तर असंच वाटतं की मी याच्यासोबत रोमँटिक रिलेशनशिपमध्ये आहे. (Relationship with Chatbot)

दुसऱ्या एका तरुणीने सांगितलं, की खऱ्या आयुष्यात एक आयडियल बॉयफ्रेंड शोधणं खूपच अवघड आहे. सर्व लोकांचे स्वभाव वेगवेगळे असतात, त्यामुळे बऱ्याच वेळा वाद होऊ शकतात. मात्र, एआय बॉयफ्रेंडसोबत असं होत नाही. (Artificial Intelligence)

जगभरात क्रेझ

केवळ चीनच नाही, तर जगभरात अशा प्रकारच्या एआय अ‍ॅप्सची (AI partner chatbots) क्रेझ वाढत चालली आहे. व्हर्चुअल पार्टनर असणारे चॅटबॉट्स लोकांना अधिक पसंत पडत आहेत. अर्थात, यामुळे कित्येकांचे सुरू असणारे संसार मोडले आहेत; तर काहींना तुरुंगाची हवा देखील खावी लागली आहे. त्यामुळे तंत्रज्ञानावर किती विसंबून रहायचं याचा विचार करणं देखील गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT