Best Hill Stations esakal
टूरिझम

Best Hill Stations : नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करायचे आहे? मग, दक्षिण भारतातील 'या' हिलस्टेशन्सची करा निवड

दक्षिण भारत हा आपल्या देशातील असाच एक विलोभनीय भाग आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Best Hill Stations : भारत हा देश विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशातील राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खाद्यसंस्कृती आणि इतिहास आहे. यासोबतच देशातील अनेक राज्यांमध्ये निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य पहायला मिळते.

दक्षिण भारत हा आपल्या देशातील असाच एक विलोभनीय भाग आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य जगभरात प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतात केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये अशी अनेक अद्भूत ठिकाणे तुम्हाला पहायला मिळतात.

दक्षिण भारत जसा तेथील समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसाच, तो तेथील काही प्रेक्षणीय आणि आकर्षक हिल स्टेशन्ससाठी प्रसिद्ध आहे. आज आपण दक्षिण भारतातील काही नयनरम्य हिलस्टेशन्सबद्दल जाणून घेणार आहोत. जिथे तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नक्कीच जाऊ शकता.

वागामों हिल स्टेशन

केरळमधील सुप्रसिद्ध ठिकाण म्हणून वागामो प्रसिद्ध आहे. हे हिलस्टेशन समुद्रसपाटीपासून १ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर वसलेले आहे. हे अतिशय मनमोहक आणि नयनरम्य हिलस्टेशन आहे.

या परिसरातील उंच पर्वत, घनदाट जंगले, तलाव आणि धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे, देश-विदेशातील अनेक पर्यटकांची येथे मांदियाळी पहायला मिळते. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण नंदनवन आहे.

वायनाड

केरळमधील सुप्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुन्नार हिलस्टेशनला तर सगळे जण जातात. मात्र, जर तुम्हाला नवीन वर्षाचे स्वागत काही वेगळ्या अंदाजात करायचे असेल तर वायनाड हे हिलस्टेशन तुमच्यासाठी बेस्ट आहे.

waynad

वायनाडमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करण्यासोबतच तुम्ही येथील चेंबरा पीक, वायनाड वन्यजीव अभयारण्य, कुरूव बेट, पूकोट तलाव आणि बाणासूर हिल्स यांसारखी अद्भूत आणि प्रसिद्ध ठिकाणे देखील तुम्ही एक्सप्लोअर करू शकता.

कूर्ग

कूर्ग हे कर्नाटक राज्यातील सर्वात प्रसिद्ध असे ठिकाण आहे. येथील नयनरम्य परिसर हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे. जगभरातील अनेक पर्यटक या हिलस्टेशनला भेट देण्यासाठी दरवर्षी गर्दी करत असतात.

koorg

‘भारताचे स्कॉटलंड’ म्हणून ही या कूर्ग हिलस्टेशनची खास ओळख आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हे ठिकाण एकदम बेस्ट आहे. येथील कॉफीच्या बॅगा,एबी फॉल्स, केर लेक, नामड्रोलिंग मठ इत्यादी ठिकाणे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT