टूरिझम

Pre Wedding Photoshoot : प्री-वेडींग फोटोशूट प्लॅन करताय? मग कोलकातामधील ही ठिकाणं आहेत बेस्ट..

कोलकातामधील या ठिकाणी करु शकता प्री-वेडिंग शूट...

Aishwarya Musale

गेल्या काही वर्षांपासून लग्नाआधी प्री-वेडिंग फोटोशूटकडे जोडप्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचाही कल वाढलेला दिसून येत आहे. प्री-वेडिंग फोटोशूट हे खास आठवणी जपण्याचा उत्तम मार्ग आहे. आज जवळपास प्रत्येक जोडप्याला प्री-वेडिंग फोटोशूट करायला आवडते.

प्री-वेडिंग फोटोग्राफीसाठी अनेक जोडपी देशाच्या विविध भागात पोहोचत असतात. राजस्थानप्रमाणेच आग्रा, दिल्ली, हिमाचल, उत्तराखंड किंवा दक्षिण भारतातील अनेक ठिकाणे प्री-वेडिंग फोटोशूटसाठी योग्य ठिकाणे मानली जातात.

जर तुम्ही प्री वेडिंगसाठी पश्चिम बंगालमधील काही उत्तम ठिकाणे शोधत असाल तर आम्ही तुम्हाला कोलकातामधील अशा काही रोमँटिक ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही अविस्मरणीय फोटोग्राफी करू शकता.

व्हिक्टोरिया मेमोरियल

कोलकात्यात सुंदर ठिकाणे पाहण्यासाठी आणि फोटोशूटसाठी कोणत्याही सर्वोत्तम ठिकाणाचा उल्लेख केल्यावर व्हिक्टोरिया मेमोरियलचे नाव निश्चितपणे घेतले जाते. व्हिक्टोरिया मेमोरियल हे पश्चिम बंगाल तसेच देशासाठी ऐतिहासिक वारसा आहे.

तुम्हाला तुमच्या प्री वेडिंग फोटोशूटमध्ये कोलकाता येथे बांधण्यात आलेला कोणताही ब्रिटिशकालीन राजवाडा समाविष्ट करायचा असेल, तर तुम्ही व्हिक्टोरिया मेमोरियलचा समावेश करू शकता. व्हिक्टोरिया मेमोरियल तुमच्या फोटोला आकर्षक बनवू शकते. येथे फोटोशूट करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल.

हावडा ब्रिज

हावडा ब्रिज हा केवळ कोलकाताचाच नाही तर संपूर्ण पश्चिम बंगालसाठी एक महत्त्वाचा लँडमार्क आहे. हुगळी नदीवर बांधलेला हा पूल लाखो पर्यटकांना आकर्षित करतो. हा पूल पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येतात.

फोटोशूटसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून जोडपे हावडा ब्रिजवर पोहोचतात. इथे काढलेले फोटो नक्कीच आयुष्यभर संस्मरणीय राहतील. आम्ही तुम्हाला सांगतो की हावडा ब्रिजवर तुम्ही मोफत फोटोशूट करू शकता. फोटोशूट करताना ट्रॅफिक लक्षात ठेवावे लागते, कारण पुलावरुन बरेच लोक ये-जा करतात.

मार्बल पॅलेस

1835 च्या सुमारास राजा राजेंद्र मलिक यांनी बांधलेला मार्बल पॅलेस कोलकातामधील सर्वात प्रसिद्ध प्राचीन वारसा आहे. या राजवाड्याची वास्तू पर्यटकांना खूप आकर्षित करते, कारण वास्तुकला अप्रतिम आणि अकल्पनीय आहे.

तुम्हाला तुमचं प्री-वेडिंग फोटोशूट एखाद्या भव्य पॅलेसमध्ये करायचं असेल, तर तुम्ही इथे जायला हवं. जर तुम्ही इतिहास प्रेमी असाल, तर हे प्री-वेडिंगसाठी योग्य ठिकाण असू शकते. येथे फोटोशूट करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल.

बॉटनिकल गार्डन

कोलकाताचे बोटॅनिकल गार्डन निसर्गप्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. बॉटनिकल गार्डनमध्ये 12 हजाराहून अधिक प्रकारची झाडे आणि वनस्पतींमध्ये तुम्ही एक संस्मरणीय प्री-वेडिंग फोटोशूट करू शकता. वसंत ऋतूमध्ये दररोज हजारो जोडपी प्री-वेडिंग फोटोग्राफीसाठी येथे पोहोचतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT