Viral Video Sakal
Trending News

सीटबेल्ट लावा नाहीतर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही; Viral Video पाहून ठरवा

गाडी चालवताना सीटबेल्ट लावणे किती महत्त्वाचे आहे हे हा व्हिडिओ पाहून कळेल

सकाळ डिजिटल टीम

अनेक अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. चालकाच्या चुकीमुळे किंवा नजरचुकीमुळे सहसा अपघात होत असतात. अपघात होण्याआधी काळजी घेणे महत्त्वाचे असते. चारचाकी गाडी चालवताना सीटबेल्ट आणि दुचाकी चालवताना हेल्मेट लावणे सक्तीचे असूनही अनेकजण लावत नाहीत. सीटबेल्ट न लावल्यामुळे काय झालं ते व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहा.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका चारचाकी गाडीचा अपघात होताना दिसत आहे. तर यामध्ये गाडीमधील एक व्यक्ती जवळपास तीस फूट उंच उडून रस्त्यावर आदळत आहे. यामुळे या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. तर गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. सदर व्यक्तीनने सीटबेल्ट लावला असता तर तो गाडीतून एवढ्या वर उडाला नसता आणि धोका टळला असता.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्याला गाडी चालवताना सीटबेल्ट किती महत्त्वाचा आहे ते कळेल.

सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन बनले असून यावर अनेक विनोदी, डान्स, सीसीटीव्ही, लग्न, युवक युवतीचे, जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जात असतात. व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून किंवा इंस्टाग्रामवरील रील पाहून अनेकजणांचा दिवस आनंदात जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Husband Attacks Wife Friend : नाशिकच्या गोदाघाटावर रक्ताचा सडा! पत्नीला मित्रासोबत फिरताना पाहून पतीनं जे केलं, ते पाहून तुम्हीही हादरून जाल

Nashik Krushikumbh : नाशिकमध्ये 'कृषिकुंभ-२०२६'चा जागर! एआय तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीचे मिळणार धडे

E- Sakal No.1 Marathi News Protal : डिजिटल युगात मराठी पत्रकारितेचा दबदबा; कॉमस्कोरमध्ये ई-सकाळची कामगिरी नंबर 1

Sangli Zilla Parishad Politics : सांगली जिल्हा परिषदेत ‘व्हीप’वरून अजित पवार गटात दुफळी, जिल्हाध्यक्षांकडे झेडपी अध्यक्ष; जयंत पाटलांची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये झेरॉक्स कॉपी पुरवल्याप्रकरणी संबंधित केंद्र संचालक आणि शिक्षकांवर होणार कारवाई

SCROLL FOR NEXT