Adibatla woman kidnapped in telangana esakal
Trending News

VIDEO : गुंडागर्दीची हद्दच! 100 हून अधिक तरुणांनी घरात घुसून डाॅक्टर मुलीला नेलं पळवून; कारण जाणून धक्काच बसेल!

व्हिडिओमध्ये तरुण महिलेच्या कुटुंबीयांना मारहाण करताना दिसत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

व्हिडिओमध्ये तरुण महिलेच्या कुटुंबीयांना मारहाण करताना दिसत आहेत.

तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्ह्यातील (Telangana) आदिबाटला इथं एका 24 वर्षीय महिलेचं तिच्या घरातून अपहरण करण्यात आलं. तिचं अपहरण करण्यासाठी किमान 100 लोक तिच्या घरात घुसले आणि जबरदस्तीनं तिला घेऊन गेले.

वैशालीच्या पालकांनी सांगितलं की, जवळ-जवळ 100 पुरुष आमच्या घरात घुसले आणि त्यांनी घरातील सामनाची तोडफोड केली. शिवाय, त्या लोकांनी माझ्या मुलीला जबरदस्तीनं घेऊन गेले. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तरुण महिलेच्या कुटुंबीयांना मारहाण करताना दिसत आहेत. याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केलाय.

तेलंगणाच्या राजधानीजवळ असलेल्या आदिबाटला (Adibatla) भागात ही घटना घडली. महिला दंतचिकित्सक असल्याचं सांगितलं जात आहे. "हत्येचा प्रयत्न आणि अपहरणाच्या आरोपाखाली आतापर्यंत एकूण 16 जणांना अटक करण्यात आलीय. सहा तासांत महिलेची सुटका करण्यात आली," असं राचकोंडाचे पोलिस (Rachakonda Police) आयुक्त महेश बागवत यांनी सांगितलं. मुख्य आरोपी नवीन रेड्डीनं पोलिसांना सांगितलं की, त्याचं आधीच लग्न झालं आहे. मात्र, मुलीच्या पालकांनी ती डॉक्टर झाल्यानंतर विचार बदल्याचा आरोप नवीननं केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: गौतम गंभीर भारतीय संघासोबत झिम्बाब्वेत का नाही? मुख्य प्रशिक्षक मग कोण? BCCI ने घेतला निर्णय

Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Latest Marathi Update : मुसळधार पावसामुळे मक्कासार गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण

Indigenous Rice Aambegaon: आंबेगावात दुर्मिळ देशी भात वाण संवर्धनासाठी लागवड प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT