Amravati Viral Video Sakal
Trending News

Viral Video : "मी अंधश्रद्धा पसरवत नाही"; व्हायरल झालेला चुलीवरचा बाबा म्हणतो...

हा चमत्कार सिद्ध केल्या आम्ही त्यांना ३० लाखांचं बक्षीस देऊन असं आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

गरम तव्यावर बसून आपल्या भक्तांना आशिर्वाद देणाऱ्या एका बाबाचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होतोय. तुमच्यापर्यंतही हा व्हिडीओ पोहोचला असेलच. या व्हिडीओतल्या बाबाने आता आपली भूमिका मांडली आहे. आपण साधूसंत नसल्याचा दावाही त्याने केला आहे.

कोण आहे हा चुलीवरचा बाबा?

हा बाबा अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातल्या मार्डी इथला आहे. या बाबाचं नाव संत गुरुदास महाराज असं आहे. या व्हिडीओमध्ये हा कथित बाबा तव्यावर बसून भक्तांना आशिर्वाद देताना दिसत आहे. गुरुदास महाराज गौरक्षणाचं काम करतो, तिथे त्याचा आश्रमही आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या बाबाला आव्हान दिलं आहे. हा चमत्कार जर खरा असेल, तर त्यांनी तो सिद्ध करून दाखवावा. आम्ही त्या महाराजांना ३० लाख रुपयांचं बक्षीस देऊ, असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव हरीश केदार म्हणाले.

त्यानंतर या बाबाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी कुठलंही अंधश्रद्धेचं काम करत नाही. मला दैवी शक्ती प्राप्त होते. त्यावेळी मला कुठलंही भान नव्हतं. मी अंधश्रद्धा पसरवत नाी, हा श्रद्धेचा भाग आहे, मी साधू संत नाही, असा दावा या गुरुदास महाराजने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जीवदान मिळालं, तरी गणित फसलं! विक्रमांचा पाऊस पाडणारा Virat Kohli कसा बाद झाला पाहा... Video Viral

Woman Mountaineer : पुण्यातील महिला गिर्यारोहकांनी ‘माऊंट मेंटोक कांग्री-२’ शिखरावर फडकवला तिरंगा

Latest Marathi News Live Update : केतन अन् सियाच्या साखरपुड्याचा व्हिडिओ अखेर समोर

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता ऑनलाईनऐवजी ऑफलाईन, आयोगाचा मोठा निर्णय, मुख्य परीक्षेच्या तारखेतही बदल...

Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

SCROLL FOR NEXT