Video Viral Sakal
Trending News

Video Viral : 'बिहार में आपका स्वागत है'! ट्रेन थांबवून ड्रायव्हरलाच करावं लागतं रेल्वे गेट बंद

सकाळ डिजिटल टीम

ट्रेन आली की ट्रॅकवरून जाणारे रस्ते ट्रेन पुढे जाईपर्यंत बंद केले जातात. रस्त्यावर असलेले रेल्वे गेट बंद करून दोन्ही बाजूची वाहतूक बंद केली जाते. पण रेल्वे आल्यानंतर रेल्वे ड्रायव्हरलाच खाली उतरून रेल्वे गेट बंद केल्याचा प्रकार आपण याआधी कधी पाहिला नसेल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ बिहारमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. तर "बिहार मैं आपका स्वागत है, आत्मनिर्भर भारताचं खरं प्रतीक" असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सदर व्हिडिओमध्ये एक ट्रेन रेल्वे गेटजवळ येऊन थांबते आणि त्यातील ड्रायव्हर खाली उतरून रेल्वे गेट बंद करतो.

दरम्यान, ट्रेन पुढे निघून गेल्यावर मागच्या डब्यात असलेला रेल्वे कर्मचारी पुन्हा हे गेट उघडतो आणि ट्रेनमध्ये जाऊन बसतो. त्यानंतर ट्रेनही पुढे निघून जाते आणि वाहतूकही सुरू होते. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. पण बिहारमधील ही परिस्थिती पाहून नेटकऱ्यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. या पद्धतीमुळे ट्रेनला ठरलेल्या वेळेत पोहोचायला उशीर होत असल्यामुळे प्रवाशांनाही त्रासाला सामोरे जावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT