Viral Video Sakal
Trending News

Viral Video : बजरंग बलीसमोरच 'बिकिनी शो'? महिलांच्या स्पर्धेवर काँग्रेसची टीका

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ : मध्यप्रदेशातील रतलाम येथे आयोजित केलेल्या ज्युनिअर बॉडी बिल्डिंग स्पर्धा आता वादात सापडली आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या महिला बिकिनीवर असून पाठीमागे बजरंग बलीची मुर्ती ठेवल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या जन्मदिनानिमित्ताने रतलाम येथील भाजप महापौरांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये बजरंग बलीच्या मुर्तीसमोरच महिलांनी बिकीनी घालून प्रदर्शन केल्यामुळे बजरंग बलीचा अपमान झाल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

काँग्रेस नेते मयंत जाट आणि प्रदेश काँग्रेस महामंत्री पारस सकलेचा यांनी हिंदू धर्माचा आणि बजरंग बलीचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.

काँग्रेसच्या आरोपाला भाजप नेत्यांनीही चांगलेच प्रत्युतर दिले आहे. काँग्रेसने केलेल्या आरोपमुळे नारीशक्तीचा अपमान झाल्याचं उत्तर भाजपने दिलं आहे. तर ज्या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन झाले होते ते ठिकाण गोमुत्राने धुवून त्या ठिकाणी हनुमान चालिसाचे पठन होणार असल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जो रूट भिडला, इंग्लंडला विजय मिळवून दिला! भारताच्या पराभवामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

SCROLL FOR NEXT