Turkey Earthquake birds Video 
Trending News

Turkey Earthquake Video : भूकंपाआधी पक्षी बिथरले, सावध करण्याचा प्रयत्न?; 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

Turkey Earthquake birds Video : पश्चिम आशियातील तुर्कीसह 4 देशांमध्ये (लेबनॉन, सीरिया आणि इस्रायल) भूकंपाने हाहाकार माजवला आहे. पहिल्या 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर या देशाला अनेक हादरे बसले आहेत.या दरम्यान जमीनदोस्त झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली हजारो लोक गाडले गेले आहेत. आतापर्यंत 4 हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत, तर हजारो लोक जखमी झाले आहेत.

या भीषण संकटानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ फोटो व्हायरल होत आहेत. काही लोकांनी नेदरलँड्सचे वैज्ञानिक फ्रँक होगरबीट्स यांचं ट्विट पुन्हा शेअर करणे सुरु केले आहे ज्यामध्ये त्यांनी भूकंपाबद्दल भविष्यवाणी केली होती. या ट्विटमध्ये त्यांनी लिहीलं होतं की, साऊथ सेंट्रल तुर्की, जॉर्डन, सीरिया आणि लेबनॉन येथे 7.5 तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो आणि झालं देखील तसंच..

यानंतर आथा जियोपॉलिटिक्स सिक्योरिटीशी निगडीत एक चॅनल OsintTV तुर्कीमधील एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पक्षी कोलाहल करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ तुर्कीमधील विनाशकारक भूकंप येण्याआगोदरचा असल्याचे सांगितले जात आहे. तसेच येऊ घातलेल्या संकटाची पक्षांना चाहूल लागल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. हे पक्षी येणाऱ्या संकटाबद्दल इशारा देण्याचा प्रयत्न करत असतील का? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

ट्विटमध्ये म्हटले गेले आहे की, तुर्की मध्ये भूकंपाच्या काही वेळ आधी पक्षांचे विचीत्र वर्तन पाहायला मिळाले होते, यावर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत आणि पक्षांना या संकटाची चाहूल आधीच लागली होती असे लिहीत आहेत.

4,300 हून अधिक लोकांचा मृत्यू...

तुर्कीला 7.8, 7.6 आणि 6.0 तीव्रतेचे सलग तीन विनाशकारी भूकंपाचे हादरे बसले आहेत. यानंतर तुर्कस्तान, सीरियामध्ये भूकंपात मृतांची संख्या 4,300 वर पोहोचली आहे.अजूनही हजारो लोक कोसळलेल्या घराखाली अडकले आहेत. यामुळे मृतांची संख्या वाढतच जात आहे. यातच हजारो इमारतींच्या ढिगार्‍यांमध्ये वाचलेल्यांचा शोध घेत दोन्ही देशांतील बचावकर्ते हाताने खोदकाम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT