Govinda Video Sakal
Trending News

Video Viral : व्वा रे पठ्ठ्या...; चौथा थरावरून दोघांना खांद्यावर घेत गोविंदाने मारल्या 20 बैठका

सकाळ डिजिटल टीम

गोपाळकाला निमित्त राज्यभरात आणि देशभरात दहिहंडी उत्सव पार पडला. यावेळी गोविंदांनी थर लावून हंडी फोडल्या. राज्यभरातील दहीहंडी उत्सवामध्ये झालेल्या दुर्घटनेत एका गोविंदाचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. तर सध्या एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये एक गोविंदा चौथ्या थरावर बैठका मारताना दिसत आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ दहिहंडी उत्सवातील असून त्यामध्ये गोविंदांनी तब्बल सहा थर लावलेले दिसत आहेत. खाली अनेक गोविंदा त्यांच्या संरक्षणासाठी उभे असलेले दिसत असून त्यामध्ये चौथ्या थरावर असलेला एक गोविंदा आपल्या खांद्यावर दोन गोविंदांना घेऊन २० बैठका मारत आहे.

दरम्यान, यावेळी सर्व भाविक श्वास रोखून या प्रकाराकडे पाहत आहेत. हा खेळ साहसी वाटत असला तरी तेवढाच धोकादायक आहे. गोविंदांच्या संरक्षणासाठी नीट व्यवस्था या ठिकाणी केलेली दिसत नाही. तर एका गोविंदाच्या खांद्यावर दोन गोविंदा उभे असताना त्याने वीस बैठका मारणे हे धोकादायक आहे.

आयोजक आणि गोविंदांनी सुद्धा दहिहंडी उत्सावावेळी आपल्या जीवाची आणि आपल्या संघाच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT