Viral VIdeo Sakal
Trending News

Viral Video : नवरीचा रोडवर रील शो अन् पोलिसांचा जलवा! क्षणात उतरवली मस्ती

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियासाठी रील बनवणे आता नवे राहिले नाही. रील बनवण्यासाठी आणि सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. स्टंट करणे, डान्स करणे, नियम मोडणे असे वेगवेगळे प्रयोग रीलसाठी केले जातात. तर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक नवरी गाडीवर बसून रील बनवताना दिसत आहे.

सदर व्हिडिओ दिल्ली येथील असून एक नवरी नवरीच्या वेशामध्ये दुचाकीवर बसून रील बनवत आहे. 'सजनजी वारी वारी' हे गाणं या रीलच्या पाठीमागे लावलं असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या तरूणीवर कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी 10 जून 2023 राजी या तरूणीवर कारवाई करत स्लिपचा तपशील अधिकृत ट्वीटरवरून शेअर केला आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी स्कूटर चालवणाऱ्या महिलेवर हेल्मेटशिवाय गाडी चालवल्याबद्दल 1,000 रुपये दंड ठोठावण्यात आला. त्याचबरोबर विना परवाना वाहन चालवल्यास 6,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तिला नवरीच्या वेषात गाडी चालवून रील बनवणे चांगलेच महागात पडले असून लगेच तिला तिच्या रीलचे फळ मिळाले आहे.

दिल्ली पोलिसांनी व्हायरल केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, "रस्त्यावर रील बनवणे चुकीचे असून एका रील साठी आयुष्य धोक्यात घालू नये, रस्त्यावर असे स्टंट करू नयेत" असा संदेश दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : सामनाही गमावला अन् आता BCCIचा कारवाईचा बडगा... हार्दिक पांड्याची दुतर्फा गोची, पुन्हा असं केल्यास बंदी?

स्वरांच्या युगाचा अंत ! आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामामात पार पडले अंत्यसंस्कार

ICC चा मोठा धमाका! टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा; IPL लाही टक्कर देत रकमेत १० पट वाढ

Shahajibapu Patil: तर शिवसेनेचे ५-६ आमदार निवडून येतील: शहाजीबापू पाटील, सोलापूरमध्ये तानाजी सावंत यांना लक्ष घालायला सांगा!

IPL 2026 : टीम डेव्हिडची सर्व 'मस्ती' उतरवली; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अम्पायरने समाजावूनही ऐकला नाही, आता... Video

SCROLL FOR NEXT