Viral Video Sakal
Trending News

Video : दिल्लीत चाकूने भोसकून विद्यार्थ्याची हत्या; जन्मदात्या पित्याला आवरले नाही अश्रू

दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा चाकून भोसकून खून करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पस येथील आर्यभट्ट कॉलेजच्या बाहेर एका १९ वर्षाची चाकून भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना रविवारी घडली असून निखील चव्हाण असं हत्या झालेल्या १९ वर्षाच्या विद्यार्थ्याचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी निखिलचा त्याच्या मैत्रिणीशी गैरवर्तन करणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्याशी वाद झाला होता.

अधिक माहितीनुसार, सात दिवसांपूर्वी मित्रांसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून खून करण्यात आला असल्याची माहिती आहे. रविवारी तीन आरोपी दुचाकीवरून आले आणि कॉलेजच्या गेट समोर निखील याला चाकूने भोसकून त्याचा खून केला. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. स्थानिकांनी निखीलला मोती बाग येथील चारक पालिका हॉस्पिटलमध्ये दाखल केले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, या घटनेनंतर निखीलच्या वडिलांचा व्हिडिओ समोर आला असून मुलाच्या हत्येनंतर त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. तर पोलिसांकडून अजून एकही शब्द बोलण्यात आला नसल्याचा आरोपही त्यांनी माध्यमांसमोर केला आहे. निखीलच्या जन्मदात्या वडिलांच्या डोळ्यातील अश्रू पाहून तुम्हालाही अश्रू अनावर होतील.

आरोपींचा एक फोटो समोर आला असून त्यामध्ये ते दुचाकीवरून जाताना दिसत आहेत. तर अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT