Farmer Video Sakal
Trending News

Viral : 'पिकवा अन् विका' यातून हा शेतकरी रोज कमावतो 3 हजार; Video एकदा पाहाच

प्रत्येक शेतकऱ्याने या पद्धतीचा अवलंब केला तर एकही शेतकरी गरीब राहणार नाही

सकाळ डिजिटल टीम

अनेक कारणावरून शेतकरी अडचणीत सापडल्याच्या बातम्या येत असतात. तर अनेकदा शेतकरी नापिकी, अतिवृष्टी, दुष्काळ या कारणामुळे हवालदिल झालेला असतो. महाराष्ट्रात अनेक शेतकरी या समस्यामुळे आत्महत्या करत असतात. तर सध्या एका शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्याने इतर शेतकऱ्यांसाठी मोठा संदेश दिला आहे.

व्हायरल होत असलेला शेतकरी हा रस्त्याच्या कडेला काही फळे आणि प्रक्रिया केलेले पदार्थ विकताना दिसत आहे. त्याच्याकडे पपई, हळद, लाकडी घाण्यावरील तेल, मोसंबी हे उत्पादने विकायला आहेत. हे सगळे उत्पादने तो आपल्या शेतातील पिकातून तयार करतो तर फळे त्याच्याच शेतातील आहेत. तो हे विकून रोज तीन हजार रूपये कमावतो हे या व्हिडिओत सांगताना दिसत आहे.

दरम्यान, या शेतकऱ्याचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला असून पिकवा आणि स्वत:च विका या माध्यमाचा वापर करून प्रत्येक शेतकऱ्याने शेती केली तर एकही शेतकरी गरीब राहणार नाही. या शेतकऱ्याने लाकडी घाण्यावरील तेल आणि प्रक्रिया केलेली हळद विक्रीसाठी ठेवली आहे. त्याने आपल्याकडील कच्च्या मालाला भाव नसल्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया केली आहे हे प्रत्येक शेतकऱ्याने ओळखलं पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT