Video Viral Sakal
Trending News

Video Viral : "यमदेव सुट्टीवर असले की जगण्याच्या अशा ऑफर मिळत असतात"; व्हिडिओ पाहून झोप उडेल

नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर काही व्हिडिओ पाहून आपणही थक्क होऊन जातो. काही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक कार भरधाव वेगात वाहनांमधून रस्त्याच्या पलीकडे जाताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका रस्त्यावरील चौकातील आहे. काही वाहने सिग्नलला उभे राहिले आहेत तर काही वाहने सिग्नल सुटल्यानंतर पुढे जात असताना दिसत आहेत. तेवढ्यात एक कार भरधाव वेगाने वाहनांच्या मध्ये घुसते. वाहनांच्या गर्दीमधून ती पुढे जाते पण सुदैवाने या कारने एकाही वाहनाला धडक दिली नाही. त्यामुळे मोठा अपघात टळला आहे.

दरम्यान, या कारचा वेग एवढा होता की दुसऱ्या गाडीला चुकून धडक बसली असती तर त्या गाडीचा चुराडा झाला असता. पण सुदैवाने काहीच न झाल्यामुळे या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीसुद्धा मजेशीर कमेंट केल्या आहेत. "यमदेव रविवारच्या सुट्टीवर असले की जगण्याच्या अशा ऑफर मिळत असतात" अशा विनोदी कमेंट नेटकऱ्यांनी केल्या असून अनेकांनी हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघरमध्ये रुग्णालयात राडा अंगलट; शिवसेनेच्या कार्यालातून ६ पदाधिकाऱ्यांसाठी फतवा, एकनाथ शिंदेंची भूमिका...

फाटक्या विचारांचे पाकिस्तानी! म्हणतात, आम्हाला Asia Cup नकोय, भारताचा पराभव हवाय; ५५ वर All OUT झाले, हे विसरले Video

Nevasa Elderly Couple: पिण्याचे पाणीही हिरावले! नेवासेतील ज्येष्ठ दाम्पत्याचा संघर्ष; पाइपलाइन तोडली अन् काय घडलं..

कोरोना लसीमुळे कॅन्सर अन् हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय? नाना पटोलेंच्या दाव्यात किती तथ्य; खरं काय जाणून घ्या

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

SCROLL FOR NEXT