Viral VIdeo Sakal
Trending News

Fathers Day Video : असा बाप होणे नाही! 'फादर्स डे'ला पायताणानं हाणत दिलं रिटर्न गिफ्ट

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

काल फादर्स डे च्या निमित्ताने अनेकांनी आपल्या वडिलांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असतील किंवा एक लांबलचक पोस्ट लिहिली असेल. पण ९० च्या दशकाच्या काळातील ग्रामीण भागातील तरूणांचं बालपण काही वेगळंच होतं. खोड्या करणे, उनाडक्या करणे, रानावनात हिंडणे आणि त्यामुळे आईवडिलांचा मार खाणे या गोष्टी सर्वांनी अनुभवल्या असतील.

सध्या फादर्स डे च्या निमित्ताने एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ तसा जुना आहे. एक मुलगा काही मुलांमध्ये पारावर बसलेला असताना त्याचा बाप येतो आणि त्याला चप्पलेने जबर मारहाण करतो. "इथे का आलास? तुला सांगितलेलं काम केलंस का?" असं काहीतरी तो बोलत आहे. तर चप्पलेने सात आठ फटके मारल्यानंतर मुलाला चांगलीच अद्दल घडली आहे.

दरम्यान, या प्रकारच्या बापाचा दरारा किती असतो हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. लेकाला मारत असताना एकही मुलगा भांडणे सोडवायला धजावत नाही. पण या बापाची मुलाला मारण्यामागे एक वेगळीच काळजी असायची. मुलाला वाईट वळण लागू नये, त्याने चांगलं शिकून मोठं व्हावं अशी प्रत्येक बापाची इच्छा असते. त्यामुळे मुलांना मारण्यामागचा त्यांचा उद्देशही तसाच असतो.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "असा बाप होणे नाही, 'फादर्स डे'चं मुलाला मिळालेलं रिटर्न गिफ्ट" अशा विनोदी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केल्या आहेत. आपल्यापैकीही अनेकांनी असा अनुभव घेतला असून वडिलांचा मार खाल्ला असेल. फादर्स डे च्या निमित्ताने अनेकांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat Canada Visit : भारत 'महाशक्ती' की ‘विश्वगुरू’ ? कॅनडातील भाषणात मोहन भागवतांनी सांगितला भारतीय विचार

Kolhapur Wildlife News : गगनबावड्यात आढळला साडेपाच फूट लांबीचा अजगर; ग्रामस्थांची उडाली भंबेरी, वन विभागाच्या प्रसंगावधानाने टळला मोठा धोका

Pune Crime: कौटुंबिक वादातून मुलाकडून आईला बेदम मारहाण; उपचारांपूर्वीच मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना यवत पोलिसांची नोटीस; आक्रोश मोर्चाबाबत महत्त्वाच्या सूचना

Nepal Flood: नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलयाचा धोका! भोटेकोसी नदी फुगली; ७८८ मृत्यू, तीन हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता

SCROLL FOR NEXT