General Knowledge esakal
Trending News

General Knowledge : स्मार्टफोनमध्ये हे लहानसं छिद्र कशासाठी असतं माहितीये? याशिवाय फोन निकामी

स्मार्टफोनमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला समजत नाहीत, आणि माहितही नाही

साक्षी राऊत

Smartphone Tiny Hole : स्मार्टफोन हा हल्ली प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य आहे. मात्र तुम्हाला स्मार्टफोनबाबतच्या या काही गोष्टी माहितीयेत काय? स्मार्टफोनमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला समजत नाहीत, आणि माहितही नाही.

चार्जिंग कोर्टच्या शेजारी एक लहान छिद्र आपल्या प्रत्येकालाच दिसते, बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की फोनमध्ये वापरलेले एक अतिशय खास वैशिष्ट्य या छिद्राच्या मदतीने अॅक्सेस केले जाते, जर ते नसेल तर स्मार्टफोन जवळजवळ निरुपयोगी आहे. आज आम्ही तुम्हाला त्याचा उपयोग सांगणार आहोत आणि ते काय आहे हे देखील सांगणार आहोत.

या छिद्राचा उपयोग काय आहे?

हा एक नॉइज कँसलेशन मायक्रोफोन आहे जो कॉलिंग दरम्यान खूप उपयुक्त आहे. तुम्ही कॉल करत असताना बॅकग्राउंड आवाज येत असल्यास, हा आवाज कँसल करणारा मायक्रोफोन कॉल करत असलेल्या व्यक्तीपर्यंत आवाज पोहोचणार नाही याची दक्षता घेतो.

मायक्रोफोन फोनमागून येणारा आवाज रोकण्याचे काम करतो

हा लहानसा मायक्रोफोन मागून येणारा संपूर्ण आवाज कॉलवर असणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू देत नाही. कॉलवर बोलत असलेल्या व्यक्तीला फक्त फोन धरून बोलत असलेल्या व्यक्तीचा आवाज ऐकू येतो. (Technology)

छिद्र असणे महत्वाचे आहे

जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे छिद्र नसेल, तर गोंगाट असलेल्या ठिकाणी बोलणे शक्य होणार नाही, कारण आजूबाजूचा आवाज समोरच्या व्यक्तीला जास्त ऐकू येईल. अशा परिस्थितीत आता तुम्हाला हे कळले असेल की प्रत्यक्षात या छोट्याशा छिद्राचा किती मोठा उपयोग आहे ते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT