Tiger Video Sakal
Trending News

Tiger Video : कारच्या धडकेत वाघाचा दुर्दैवी मृत्यू; पाय मोडल्यानंतर उठून जंगलात गेला पण...

सकाळ डिजिटल टीम

गोंदिया : कारच्या धडकेमध्ये जखमी झालेल्या एका वाघाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यात घडली असून धडकेनंतर वाघाचा पाय मोडला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, ही घटना नागझिरा-नवेगाव कॉरिडॉरमधून जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा हायवेवर असलेल्या मुर्दोली परिसरामध्ये रात्री १० ते साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. क्रेटा गाडीच्या धडकेनंतर हा वाघ रस्त्यावरच पडला होता.

या अपघातात वाघाचा पाय मोडला होता. अपघातानंतर या वाघाने जंगलात जायचा प्रयत्न केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. हा वाघ नागझिरा जंगलातील टी१४ नंबर असलेल्या वाघिणीचा दोन वर्षाचा बछडा असल्याची माहिती समोर आली आहे.

वनविभागाने पुढील कारवाई सुरू केली असून शवविच्छेदन आणि पुढील प्रक्रिया गोरेवाडा येथे होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जंगलातील रस्त्यावरून गाड्या चलवत असताना नागरिकांनी वेग मर्यादा सांभाळली पाहिजे. त्याचबरोबर आपल्यामुळे जंगली प्राण्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुढील ३ दिवस महत्त्वाचे! राज्यात पावसाचा जोर वाढणार, विजांच्या कडकडाटासह मुसळधारेचा अंदाज; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Inspirational Story: अनवाणी पायाने धावली आई! बीडमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी जिंकली मॅरेथॉन...

Jotiba Dongar News : ऊन सावली अन् विक्रमी गर्दीत रंगली जोतिबाची नगर प्रदक्षिणा...

Marathi News Live Updates : BPSC TRE 4 मधील ३२,३८८ रिक्त पदांसाठीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे ढकलली

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

SCROLL FOR NEXT