Fact Check Sakal
Trending News

'त्या' कबरीला का लावलं होतं कुलूप? Viral झालेल्या फोटोमागचं खरं सत्य आलं समोर | Fact Check

ही कबर भारतातीलच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

हैदराबाद : पाकिस्तानमधील एका व्यक्तीने आपल्या मृत मुलीवर बलात्कार होऊ नये यासाठी तिच्या कबरीला कुलूप लावल्याची खोटी बातमी प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर ही कबर भारतातीलच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हैदराबाद येथील मस्जिद ई सालार मुल्क, दरब जंग कॉलनी, मदनापेट येथील हा फोटो असल्याची माहिती आहे.

या कबरीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर अनेक स्तरातून पाकिस्तानवर निशाणा साधला गेला होता. ही माणुसकीला काळीमा फासणारी आणि महिलांचा अपमान करणारी घटना असल्याचं म्हटलं गेलं होतं. पण नंतर हा फोटो तेलंगणा येथील हैदराबादमधील असून कबरीला कुलूप लावण्यामागे दुसरं कारण असल्याची माहिती उघड झाली.

दरम्यान, यासंदर्भात मशिदीचे मुअज्जीन मुक्तार साहब यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, "ही कबर अंदाजे 1.5 ते 2 वर्षे जुनी आहे, जी प्रवेशद्वाराच्या अगदी समोरच आहे त्यामुळे पुढे जाणाऱ्या रस्त्यावर अडथळा येतो. तर अनेकजण मृतदेह आणून या जुन्या कबरीमध्ये दफन करतात. त्यामुळे जुन्या मृतांच्या नातेवाईकांना त्रास होतो. हा त्रास होऊ नये यासाठी या कबरीला लोखंडाचे गेट लावले आहे." अशी माहिती मुक्तार यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST चा मोठा निर्णय! बसचालकांवर आता साध्या वेशातील अधिकाऱ्यांची नजर राहणार, कारण काय?

Melatonin: शांत झोपेचे रहस्य! शरीरातील मेलाटोनिन हार्मोन नक्की काय काम करते ?

Latest Marathi News Live Update : दादरमध्ये पुन्हा आंदोलन, आदित्य-अमित ठाकरे उपस्थित

Chas Dam Flood Release: चास कमान धरणातून २९,७९३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; ९९ टक्के भरलेले धरण, भिमा नदीला पूरस्थिती

Panvel News: एमएमआरडीएला मोठा झटका! पालिकेने १,२६० कोटींच्या निधीचा प्रस्ताव फेटाळला

SCROLL FOR NEXT