Viral Video Sakal
Trending News

भरधाव वेगातील सायकल खांबावर धडकणार तोच क्षणात अवतरला 'देवदूत'... | Video Viral

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Viral Video : सध्या एक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये एक व्यक्ती भरधाव वेगात आलेल्या एका लहान मुलीच्या सायकलला खांबावर आदळण्यापासून वाचवताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ ट्वीटरवरून व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

व्हायरल झालेला व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यामध्ये दोन व्यक्ती रस्त्याच्या कडेला गप्पा मारत उभे असल्याचं दिसत आहे. त्यातील एकजण सायकलवर उभा आहे. पण अचानक वेगाने गाड्या जात असलेल्या रस्त्यावर एक छोटी मुलगी सायकलवर वेगाने येताना त्याला दिसते.

खरं तर या मुलीचे सायकलवरील नियंत्रण सुटल्यामुळे ती खांबावर धडकणार तोच या व्यक्तीने तिला धरले आणि सायकल खांबावर आदळण्यापासून वाचली. सदर चिमुकलीचासुद्धा यामुळे जीव वाचला आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ऐनवेळी या व्यक्तीने मदत केल्या मुळे नेटकऱ्यांनी त्याला देवदूताची उपमा दिली आहे. तर ट्वीटरवरून अनेकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

SCROLL FOR NEXT