Viral Video Sakal
Trending News

Viral Video : 'लग्नात 21 रूपये आहेर दिलाय...'; भर पावसात डोक्यावर गाद्या घेऊन वऱ्हाड जेवलं

या व्हिडिओमध्ये लग्नातील वऱ्हाडी मंडळी भर पावसात जेवण करताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

लग्न म्हणजे पाहुणे, गावातील मंडळी, मित्र मंडळी आणि नवरदेव नवरी यांच्या कुटुंबियांसाठीचा आनंदाचा दिवस असतो. पण कधीतरी या लग्न समारंभात व्यत्यय येत असतो. कधी पाऊस तर कधी अपघात असे प्रकार घडत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका लग्नातील वऱ्हाडी मंडळी भर पावसात जेवण करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सर्वांनी डोक्यावर तेथीलच गाद्या घेतल्या आहेत. डोक्यावर गाड्या घेऊन पावसापासून वाचले पण लग्नात जेवण केलंच असा काहीसा प्रकार या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्याला हसू आवरणार नाही.

दरम्यान, व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. "२१ रूपये आहेर दिलाय वसूल तर करावाच लागेल, बाकी काही झालं तरी चालेल पण लग्नातील जेवण सोडायचं नाही, शस्त्र असतं ते" अशा मजेशीर कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्यालाही आपण कधी लग्नात जेवण केलं असेल तर त्या प्रसंगाची आठवण होईल.

सोशल मीडियावर सध्या मनोरंजनाचे साधन बनले आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये विनोदी, डान्सचे, सीसीटीव्ही, लग्नातील व्हिडिओंचा सामावेश असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT