Morocco Earthquake Video sakal
Trending News

Morocco Earthquake Video : मोरोक्कोत भूकंपाचा प्रलय! धावपळ, आरडाओरडा, डोळ्यादेखत इमारती जमीनदोस्त; थरकाप उडवणारे दृश्ये

लोकं अंगावरील कपड्यानिशी रस्त्यावर, हॉस्पिटल भरले खचाखच

सकाळ डिजिटल टीम

मोरोक्को : मोरोक्को या देशात आज भारतीय वेळेनुसार पहाटे पावणेचारच्या सुमारास मोठा भूकंप झाला. तर या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत ६०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. थरकाप उडवणारे फोटो आणि व्हिडिओ पाहून आपलंही काळीज पिळवटून निघेल.

शनिवारी पहाटेच्या सुमारास ६.८ रिश्टर स्केल तिव्रतेचे भूकंपाचे धक्के बसल्यामुले मोरोक्को येथील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. नागरिकांचे संसार उध्वस्त झाले असीन अनेक नागरिक अंगावरील कपड्यानिशी रस्त्यावर आले आहेत. हे थरकाप उडवणारे व्हिडिओ आणि हॉस्पिटलमध्ये झालेली गर्दी पाहून मन सुन्न होईल.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एका इमारतीखाली काही नागरिक बसलेले असताना त्यांना अचानक भूकंपाचे धक्के जाणवू लागतात. त्यानंतर नागरिक सैरावैरा धावू लागतात. त्यांना कुठे जावं तेही कळत नाही. तेवढ्यात इमारतीचा एक भाग खाली कोसळतो आणि त्यामध्ये एक नागरिक जखमी झाल्याचं दिसत आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मोठी इमारत क्षणात जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे.

मोरोक्कोला शक्य ती मदत देण्यासाठी भारत तत्पर - पंतप्रधान मोदी

"या दुःखद क्षणांमध्ये मी मोरोक्कोच्या लोकांसोबत आहेत. ज्या नागरिकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत. या कठीण काळात मोरोक्कोला शक्य ती सर्व मदत देण्यासाठी भारत तत्पर आहे" असं मत भारताचे प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Politics: थलापती विजय यांना मोठा धक्का! फ्लोअर टेस्टमध्ये साथ देणाऱ्या आमदारांनी पलटी मारली; तमिळनाडूच्या राजकारणात यू-टर्न

IPL 2026 Qualifier 1 : गुजरात टायटन्सची पराभवामुळ डोकेदुखी वाढली! शुभमन गिल अन् संघाची झोप उडवणारी बातमी...

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! तामिळनाडू सरकारने जाहीर केली पीक कर्जमाफी; 14 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना थेट फायदा, 'थलपती'नं दिलेलं आश्वासन पाळलं

Bike Mileage Increasing Tips : टू व्हीलर गाडीचं मायलेज कमी आहे? मग आजच करा 'हे' 5 बदल, मायलेज होईल डबल

Latest Marathi News Live Update : ईदनिमित्त बळी देण्याची परवानगी रद्द, वरिष्ठ पोलिसांची माहिती

SCROLL FOR NEXT