Mothers Day Sakal
Trending News

Viral Video : एकाच एअरलाईनमध्ये काम करणाऱ्या मायलेकींनी जिंकले मने; लेकीचं बोलणं ऐकून आईच्या डोळ्यात पाणी

हा व्हिडिओ पाहून आपल्या डोळ्यात पाणी येईल

सकाळ डिजिटल टीम

आपल्या लेकराने त्याचे ध्येय पूर्ण करावेत, त्यांनी आपल्या आयुष्यात यशस्वी व्हावे अशी सर्व आईवडिलांची इच्छा असते. पण आई ज्या ठिकाणी काम किंवा नोकरी करते त्याच ठिकाणी आपला मुलगा किंवा मुलगी मोठ्या पदावर काम करत असेल तर यापेक्षा मोठा आनंद एका आईवडिलांसाठी दुसरा कोणता नाही. सध्या एका मायलेकींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एकाच एअरलाईनमध्ये काम करणाऱ्या मायलेकी दिसत आहेत. त्या दोघीही एअर होस्टेस असून "मदर्स डे"च्या दिवशीचा व्हिडिओ पाहून आपल्याही डोळ्यात पाणी येईल. विशेष म्हणजे मदर्स डेच्या दिवशी फ्लाईटमध्ये या दोघी मायलेकी योगायोगाने उपस्थित होत्या. यावेळी लेकीने विमानात असलेल्या प्रवाशांना मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आणि आपल्या आईला आपली प्रेरणा असल्याचं उद्घोषणा करत सांगितलं आहे.

"जमिनीपासून ते ध्येयापर्यंत साथ देणाऱ्या माझ्या आईला मदर्स डे च्या शुभेच्छा" अशी उद्घोषणा आईसमोर केल्यानंतर आईच्या डोळ्यात पाणी आले आणि तिने आपल्या लेकीला मायेने मिठी मारली. हे दृश्य पाहून उपस्थित असलेल्या प्रवाशांनी टाळ्या वाजवल्या आहेत.

या मायलेकींनी सर्वांची मने जिंकले आहेत. तर या व्हिडिओवर अनेकांनी आपले मतं मांडली आहेत. इंडिगोच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT