Trending News

New Year Celebration : 'वेलकम 2024', देशभरातील लोकांनी जल्लोषात केले नवीन वर्षाचे स्वागत, पाहा व्हिडीओ

देशभरातील लोकांनी जल्लोषात केले नवीन वर्षाचे स्वागत...

Aishwarya Musale

नवीन वर्ष 2024 आजपासून सुरु झाले आहे. काल देशाच्या अनेक भागांमध्ये, लोक आनंदाच्या मूडमध्ये होते. सगळीकडे पार्ट्या सुरू होत्या. लोक नववर्षाचे उत्साहात स्वागत करताना दिसले. जम्मू-काश्मीरमधील गुलमर्गमध्ये नवीन वर्ष साजरे करण्यासाठी पंडाल सजवण्यात आले होते.

31 डिसेंबरला वर्षाच्या शेवटच्या दिवशी मंदिरांमध्येही मोठी गर्दी झाली होती. कडाक्याची थंडी असूनही लोक घराबाहेर पडले होते. दुसरीकडे, 31 डिसेंबर रोजी वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर भव्य गंगा आरती करण्यात आली.

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ पाहा...

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी शिमला येथील मॉल रोड येथे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला उपस्थित राहून आनंदोत्सव साजरा केला.

हिमाचल प्रदेशात नववर्षाची संध्याकाळ साजरी करण्यासाठी शिमल्यातील मॉल रोडवर मोठ्या संख्येने लोक जमले होते.

चेन्नई : चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ नववर्षाच्या पूर्वसंध्येला रोषणाईने सजवण्यात आले होते.

जम्मू-काश्मीर: 2023 च्या शेवटच्या दिवशी श्री माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक कटरा येथे पोहोचले होते.

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील दशाश्वमेध घाटावर वर्षाच्या शेवटच्या दिवशी भव्य आरती करण्यात आली.

मुंबईत नववर्षानिमित्त अनेक ठिकाणी भव्य सजावट करण्यात आली होती.

उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील परमार्थ निकेतन आश्रमात लोकांनी गंगा आरती केली.

दिल्लीच्या कालकाजी मंदिरात भाविकांची गर्दी

दिल्लीत मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. दिल्लीतील प्रसिद्ध कालकाजी मंदिरात नववर्षाच्या पूर्वसंध्येपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. सुमारे दीड ते दोन लाख भाविकांनी कालकाजी मंदिरात पोहोचून दर्शन घेतले. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सर्व तयारी करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT