Viral Video Sakal
Trending News

Viral Video : याला म्हणतात हाडाचा रिपोर्टर! पाण्याची खोली दाखवण्यासाठी मारली पाण्यात उडी

पाण्यातून रिपोर्टिंग थेट लाईव्ह

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानातील चाँद नवाब या टीव्ही रिपोर्टरचा व्हिडिओ काही वर्षांपूर्वी व्हायरल झाला होता. त्याचबरोबर बजरंगी भाईजान या चित्रपटामध्ये या रिपोर्टरचं पात्रसुद्धा नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारलं होतं. त्यानंतर आता एका नव्या रिपोर्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा रिपोर्टर पाकिस्तानातील असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. या पत्रकाराने पाण्याची खोली प्रेक्षकांना लाईव्ह दाखवण्यासाठी थेट पाण्यात उडी मारली आहे. तर पाण्यात उडी मारूनही त्याने आपली रिपोर्टिंग सुरू ठेवली आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्याला हसू आवरणार नाही.

या समुद्राची खोली किती आहे ते मी पाण्यात उडी मारून तुम्हाला दाखवणार आहे असं म्हणत तो पाण्यात उडी मारतो आणि पाण्यातून रिपोर्टिंग करतो. त्यानंतर पाण्यात बुडी घेऊन पाण्याची खोली किती आहे हे दाखवतो. तर त्याने पाण्यात उडी मारल्यानंतर पाठीमागे काहीजण हसतानाचा आवाज येतो. हा खराखुरा न्यूज रिपोर्टर नसून एक सोशल मीडिया Influencer असल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान, या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. "याला म्हणतात हाडाचा रिपोर्टर, लोकांच्या भावनांचा विचार करून सत्य परिस्थिती दाखवणारा रिपोर्टर, दुसरा चाँद नवाब" अशा विनोदी कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Empress Garden : एम्प्रेस गार्डनच्या जागेवर न्यायालयीन बांधकामास विरोध; १३४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा उद्ध्वस्त करण्याचा डाव

Gyanesh Kumar Impeachment : मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्याची तयारी! ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? विरोधी पक्ष संसदेत मांडणार प्रस्ताव!

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

SCROLL FOR NEXT