Viral Post Sakal
Trending News

कबरीला कुलूप लावल्याचा फोटो पाकिस्तानचा नाहीच ? आली धक्कादायक माहिती समोर | Fact Check

'देवाचा शाप, मी इस्लाम का सोडला' या पुस्तकाचे लेखक असलेल्या आणि मुस्लीम धर्म सोडलेल्या हॅरिस सुलतान यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

लाहौर : आपल्या मृत मुलीवर बलात्कार होऊ नये यासाठी पालकांनी तिच्या कबरीला कुलूप लावून ठेवल्याचं ट्वीट पाकिस्तानातील हॅरिस सुलतान यांनी केलं होतं. पण ही माहिती खोटी असून या गोष्टीची खातरजमा केली नसल्यानं त्यांनी आता माफी मागत हे ट्वीट सोशल मीडियावरून डिलीट केलं आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Viral News Fact Check

दरम्यान, 'देवाचा शाप, मी इस्लाम का सोडला' या पुस्तकाचे लेखक असलेल्या आणि मुस्लीम धर्म सोडलेल्या हॅरिस सुलतान यांनी हे ट्वीट केलं होतं. त्याने हा फोटो ट्वीट करत लिहिलं की, "पाकिस्तानने एक असा खडबडीत, लैंगिकदृष्ट्या निराश समाज निर्माण केला आहे की, लोक आता आपल्या मुलींवर बलात्कार होऊ नयेत म्हणून त्यांच्या थडग्यांवर ताळे लावत आहेत. जेव्हा तुम्ही बुरख्याचा संबंध बलात्काराशी जोडता तेव्हा तो तुमच्या मागे थडग्यात जातो." अशा शब्दांत त्याने रोष व्यक्त केला होता.

ही घटना व्हायरल झाल्यानंतर अनेक इंग्रजी वृत्तपत्रात ही बातमी झळकली होती. पण सर्व वृतसंस्थेने फक्त सुलताना यांच्या ट्वीटवरून बातमी केल्याचं मत मोहम्मद झुबेर यांनी व्यक्त केलं. तुम्ही सदर मृत मुलीच्या पालकाशी खातरजमा केली का? असा सवाल उपस्थित केल्यानंतर बलात्कार रोखण्यासाठी कबरीला कुलूप लावल्याची माहिती चुकीची असल्याचं वास्तव समोर आलं आहे.

Viral News Fact Check

दरम्यान, सदर फोटो हा पाकिस्तानातील नसून भारतातली हैदराबाद येथील असल्याचं समोर आलं आहे. मृतदेह दफन केलेल्या जागेवर काही लोकं दुसरा मृतदेह दफन करतात यामुळे हे कुलूप लावल्याची नवी माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST चा मोठा निर्णय! बसचालकांवर आता साध्या वेशातील अधिकाऱ्यांची नजर राहणार, कारण काय?

Melatonin: शांत झोपेचे रहस्य! शरीरातील मेलाटोनिन हार्मोन नक्की काय काम करते ?

Latest Marathi News Live Update : दादरमध्ये पुन्हा आंदोलन, आदित्य-अमित ठाकरे उपस्थित

Chas Dam Flood Release: चास कमान धरणातून २९,७९३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; ९९ टक्के भरलेले धरण, भिमा नदीला पूरस्थिती

Panvel News: एमएमआरडीएला मोठा झटका! पालिकेने १,२६० कोटींच्या निधीचा प्रस्ताव फेटाळला

SCROLL FOR NEXT