Video Viral Sakal
Trending News

'सैराट'पासूनची मैत्री! सल्या अन् लंगड्याचा भर पावसात भन्नाट कवायत डान्स | Video Viral

भर पावसात या दोन मित्रांनी कवायत डान्स केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सैराट हा चित्रपट आपण सर्वांनी पाहिला असेल. मराठीमध्ये सर्वांत जास्त कमाई करणारा चित्रपट म्हणून सैराटची जगभरात ओळख आहे. जवळपास तीन ते चार महिने चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट चालू होता. तर यातील पात्र सर्वांना आपलीशी वाटत होती. या चित्रपटातील आर्ची परशा तर सर्वांनाचा माहिती असतील पण सल्या, लंगड्या, आनी हे पात्र सुद्धा आपल्या मनात घर करून गेले असतील.

सैराट या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेले सल्या म्हणजेच अरबाज शेख आणि लंगड्या म्हणजेच तानाजी गलगुंडे यांची मैत्री अजूनही चांगलीच टिकून आहे. त्यांनी सैराटनंतर नागराजच्या झुंड या चित्रपटातही काम केलं आहे. तर त्यांचा आता एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, भर पावसामध्ये फिरायला गेल्यानंतर या मित्राची जोडी रस्त्यावर कवायत डान्स करताना दिसत आहे. नागीन डान्स, मोर डान्स, कोंबडी डान्स अशा अनेक प्रकारच्या विनोदी डान्सचे व्हिडिओ आपण पाहिले असतील पण लंगड्या आणि सल्याने आता नवीन डान्सचा शोध लावला आहे.

त्यांच्या या कवायत डान्सने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आत्तापर्यंत तीन हजार नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT