Nagpur Teacher School students dance on Shri Ram bhajans 
Trending News

Nagpur Teacher Dance : 'भारत का बच्चा बच्चा...' गाण्यावर शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसोबत जबरदस्त डान्स; Video होतोय व्हायरल

School students dance on Shri Ram bhajans | अयोध्येतील राम मंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रोहित कणसे

अयोध्येतील राम मंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असून यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. देशभरातील नागरिक राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची वाट पाहात आहेत. यादरम्यान सर्वत्र वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जात आहे.

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील एका शाळेतील शालेय विद्यार्थांचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शाळेतील विद्यार्थी प्रभू श्रीरामाच्या एका भजनाच्या तालावर डान्स करताना दिसत आहेत. या विद्यार्थ्यांसमोर एक महिला शिक्षीका देखील डान्स करताना दिसत आहे. शिक्षिकेसोबत विद्यार्थी रामभजनात दंग होऊन नाचताना दिसत आहे.

या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी 'भारत का बच्चा बचा' आणि 'आज गल्ली गल्ली अवध ए सजाएंगे' या गाण्यांवर नाचताना दिसले.

दरम्यान अयोध्या येथील राम मंदिरामध्ये 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या मूर्तीचे काही फोटो काल समोर आले आहेत. काळ्या पाषाणतल्या मूर्तीचे फोटो माध्यमांमध्ये झळकले आहेत. म्हैसुरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

घरबसल्या पाहाता येणार प्राण प्रतिष्ठा सोहळा

22 जानेवारीला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार होण्याची तुमची इच्छा असेल, तर तुम्ही घरबसल्या देखील हा सोहळा पाहू शकणार आहेत. या सोहळ्याला लाईव्ह पाहण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्हाला टीव्हीवर हा कार्यक्रम पहायचा असेल, तर 22 जानेवारी रोजी सकाळपासूनच दूरदर्शनवर याचे थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे. सकाळी 11 वाजेपासून या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार आहे.

मोबाईलवर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. यूट्यूबवर दूरदर्शनच्या चॅनलवर देखील याचं लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे. डीडी न्यूजवर देखील याचं प्रक्षेपण करण्यात येईल.

इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राम मंदिर ट्रस्टचे अधिकृत अकाउंट तयार करण्यात आले आहेत. याठिकाणी या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण पाहता येईल.

जिओ सिनेमा या अ‍ॅपवर प्राण-प्रतिष्ठा नावाचं सेक्शन तयार करण्यात आलं आहे. याठिकाणी देखील तुम्ही या भव्य सोहळ्याचं थेट प्रक्षेपण पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे होणार हाल; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचे आवाहन

New Kabaddi Rules Changes 2026 : कबड्डीचे नियम बदलले! आता बदली खेळाडू आणि लॉबीच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या कबड्डीचे नवीन 6 नियम

IND vs WI: वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक विजयामागे धोनीचा हात? शाय होपने उघडलं राज; म्हणाला, ‘माहीने मला हेच सांगितलं होतं...’

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

BSF Jawan: देशसेवेचे स्वप्न साकारले, २२ वर्षे सीमांवर कर्तव्य बजावले; BSF जवानाचा अचानक मृत्यू, कर्तव्यावर अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT