Viral Video Sakal
Trending News

Viral Video : सापशिडी खेळण्यासाठी तरूणांचं देशी जुगाड! "हे भारताबाहेर नाही गेलं पाहिजे"

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

लहानपणी अनेकदा आपण सापशिडी किंवा सोरट असे खेळ खेळले असतील. अनेकदा आपल्याकडे उपलब्ध साधने नसतानाही आपण काहीतरी जुगाड करून खेळ खेळत असतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये दोन मुलांनी सापशिडी खेळण्यासाठी एक जुगाड केलं आहे.

सापशिडी खेळताना आकडे कळण्यासाठी दोघांनाही फासे टाकावे लागतात. त्यामध्ये एक ते सहापर्यंतचे आकडे आपल्याला कळत असतात. तर या मुलांकडे फासा नसल्यामुळे त्यांनी एका लहान मुलाला पाण्याच्या टाकीमध्ये बसवलं आहे आणि तो यांना अंदाजे हाताच्या बोटाने आकडे दाखवत आहे.

मुलांनी काठीने टाकीवर मारल्यानंतर तो हात बाहेर काढून आकडे दाखवत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून हे जुगाड भारताबाहेर गेलं नाही पाहिजे अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT