Viral Video  Sakal
Trending News

Viral Video : ये है नया इंडिया! 'वंदे भारत'मध्ये चक्क पावसाचं पाणी; नेटकऱ्यांचे मोदी सरकारला टोमणे

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करण्यात आलं होतं. त्यानंतर या ट्रेनला जनावरे धडकून अपघात झाल्याचा प्रकारही समोर आला होता. तर ट्रेनमध्ये देण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाबाबतही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

पण सध्या एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला असून वंदे भारत ट्रेनच्या छतामधून पावसाचे पाणी गळत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे वंदे भारत ट्रेनच्या दर्जावर शंका व्यक्त केली जात आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ काँग्रेस केरला या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. तर हा व्हिडिओ वंदे भारत ट्रेनचा असून वरून पाणी गळताना यामध्ये दिसत आहे. तर जिथे पाणी गळत आहे, त्याच्याखाली पाणी साठवण्यासाठी ट्रे ठेवण्यात येत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, या गैरसोयीचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत असून प्रवाशी त्रस्त असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ८ सेकंदाचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शेअर केला असून त्यावर आपल्या मजेशीर कमेंट केल्या आहेत.

"तर आता वंदे भारत ट्रेनने प्रवास करायचा असेल तर अंघोळ करण्याची गरज नाही, ये है नया इंडिया" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या असून मोदी सरकारला टोमणे दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT