Viral Video esakal
Trending News

Viral Video : ‘तिच्या लग्नाआधीच इकडे आलो, रिक्षावर ‘AS’ लिहिलं आणि...’ व्हायरल व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी येईल

'या लिहिलेल्या अक्षरांकडे पाहतो तेव्हा मला तिची आठवण येते'

सकाळ डिजिटल टीम

Viral Video :

प्रेमात पडलेला व्यक्तीचा ब्रेकअप झाल्यावर एक तो सुधारतो किंवा पूर्णच बिघडतो. म्हणजे, ज्यामुळे ब्रेकअप झाला ती कारण शोधून यशस्वी होतो. किंवा तिच्या प्रेमात अखंड बुडून जीवनाची वाट लावून घेतो. पण, त्यातून जे लोक बाहेर पडले ते जीवनात मोठं काहीतरी नक्कीच करतात.

याचेच जीवंत उदाहरण आहे एक रिक्षावाला. त्याने प्रेम केलं आणि ते निभावलं. पण जेव्हा मध्येच प्रियसीचं लग्न झालं तेव्हा त्याने शहर सोडून दुसरीकडे काहीतरी उद्यागधंदा सुरू केला. पण,तिची आठवण सोबत रहावी म्हणून त्याने असं काही केलं की ते पाहून लोक त्यांच कौतुक करत आहेत.

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनुपमा नावाच्या युजरने हे इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. दिल्लीत अनुपमा नावाची तरूणी राहते. ती नेहमीप्रमाणे एका रिक्षावाल्याला हात करून थांबवते.

आणि एका झगमगीत, लाईट्सने चकाकणाऱ्या रिक्षात बसते. तिला या सजावटीचं जरा नवल वाटलं. जेव्हा तिने रिक्षावाल्याला याचं कारण विचारलं तेव्हा त्याने दिलेलं उत्तर मनाला स्पर्शून जाणारं होतं.

रिक्षावाला म्हणतो की, आम्ही प्रेमात होतो, पण तिने ब्रेकअप केलं आणि आम्ही वेगळे झालो. तिच्या लग्नाच्या दोन दिवस आधी मी गाव सोडलं. आणि दिल्लीला आलो. इकडे आल्यावरही ती सोबत असावी असे वाटले. त्यामुळे रिक्षावर ‘AS’ लिहीले आहे.

मी जेव्हा या लिहिलेल्या अक्षरांकडे पाहतो तेव्हा मला तिची आठवण येते. मला याकडे पाहून आनंद होतो. ती सोबत आहे असे भासते.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अनुपमाने 'मेन इन लव्ह' असे लिहिले आहे. या पोस्टला आतापर्यंत 3.27 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तर 37 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: सोन्याच्या भावात 5 दिवसांत मोठी घसरण! उच्चांकापासून तब्बल 33 हजारांनी स्वस्त; दसऱ्याआधी पाहा ताजा भाव

Distance Education: राज्यात दूरस्थ शिक्षण घेणारे वाढले ;केंद्रीय उच्चशिक्षण विभागाचा अहवाल

Train Viral Video : वा रे पठ्ठ्या ! थेट ट्रेनच्या एसी डब्यातच थाटले पानाचे दुकान, अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

स्मृती मानधनाचा कर्णधार म्हणून आज पहिला सामना! दुसरीकडे भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती...

Marathi News Live Updates: मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी, कार्यकर्त्यांकडून सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित

SCROLL FOR NEXT