Jaipur Viral Video Sakal
Trending News

Viral Video: देशी 'मनी हाईस्ट'! भर रस्त्यात कार आडवी करून तरुणाने उधळले पैसे

हा तरुण नेटफ्लिक्सवरील मनी हाईस्ट, अॅलेक्स पीना अशा क्राईम सीरिज मोठ्या प्रमाणावर पाहत होता. त्याने यावरुन प्रेरणा घेतली.

वैष्णवी कारंजकर

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये नुकतीच एक विचित्र घटना घडली. एक तरुण गाडीवर चढून पैसे उधळत होता. या प्रकारामुळे त्या भागात चांगलीच वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

जयपूरच्या मालवीय नगरमधल्या गौरव टॉवरच्या परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. हा तरुण गाडीवर उभा राहून १० आणि २० रुपयांच्या नोटा उधळत होता. यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडीही झाली होती. यातच हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर टाकण्यात आला. तो काही वेळातच वेगाने व्हायरल झाला. त्यानंतर या व्हिडीओची दखल पोलिसांनीही घेतली.

पोलीस उपायुक्त ज्ञानचंद यादव यांनी सांगितलं की, अशा पद्धतीची कृती करणाऱ्या या व्यक्तीला जवाहर सर्कल पोलिस स्टेशनने अटक केली आहे आणि त्याची चौकशी सध्या सुरू आहे. हा तरुण नेटफ्लिक्सवरील मनी हाईस्ट, अॅलेक्स पीना अशा क्राईम सीरिज मोठ्या प्रमाणावर पाहत होता. त्याने यावरुन प्रेरणा घेतली. मनी हाईस्टच्या पात्राप्रमाणेच लाल रंगाचा पोशाख त्याने परिधान केला होता.

याशिवाय त्याने या मालिकेतल्या पात्रांप्रमाणे मास्कही घातलेला होता, त्यामुळे त्याची ओळख लक्षात येत नव्हती. गाडीच्या छतावरुन पैसे उधळून हा तरुण येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत होता. त्याने उधळलेल्या या नोट्या खऱ्या आहेत की खोट्या याबद्दल मात्र अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. या नोटा कुठून आल्या, खऱ्या आहेत की खोट्या याचा तपास सध्या सुरू आहे.

आपण हे फक्त मनोरंजनासाठी केलं असल्याचा दावा हा तरुण करत आहे. यासाठी त्याने आपल्या वडिलांची कार वापरली होती. पण या कृत्यामागे काही इतर कारणं आहेत का हे पोलीस शोधत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT