Viral Video Sakal
Trending News

Viral Video : दोस्ती असावी तर अशी! नवरदेव मित्रांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला

याला म्हणतात खरी मैत्री

सकाळ डिजिटल टीम

मैत्री म्हणजे काय हो? मैत्री आणि प्रेम या दोन संकल्पना एका शब्दात व्यक्त करण्यासारख्या नसतात किंवा त्यांच्या व्याख्या प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळ्या असू शकतात. तर खरी मैत्री किंवा प्रेम टिकवणं हे प्रत्येकाला वाटत असतं. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये खऱ्या मैत्रीचं दर्शन घडलं आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा एका लग्नातील असून त्यामध्ये नवरदेव आपल्या मित्राला जोराची मिठी मारून ढसाढसा रडताना दिसत आहे. तर हे चित्र पाहून बाजूला असलेले पाहुणे मंडळीही स्तब्ध झाले आहेत. त्यानंतर एक तरूणीही त्यांना मिठी मारते. हा भावनिक क्षण इतरांच्याही डोळ्यात पाणी आणून गेला आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT