Video Viral Sakal
Trending News

बसमध्ये तरूणी शेजारी बसून तरूणाने भर गर्दीत केलं हस्तमैथून; तरूणीचा Video Viral

तरूणीने या व्यक्तीचा व्हिडिओ शूट केला असून घडलेला प्रसंग सांगितला आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोची : केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना एका व्यक्तीने महिलेच्या शेजारी बसून हस्तमैथून केल्याचा प्रकार घडला आहे. एर्नाकुलम येथून थ्रिशूर या मार्गावर ही घटना घडली आहे. यावेळी सदर व्यक्तीने शेजारच्या महिलेसोबत गैरवर्तनही केले असून सदर व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ज्या तरूणीसोबत हा प्रकार घडला आहे त्या तरूणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, ही घटना एर्नाकुलम जिल्ह्यातील अथनी येथे घडली. या घटनेनंतर शेजारी असलेली महिला नंदिता संकारा हिने पोलिसांत तक्रार दिली असून दिलेल्या तक्रारीनुसार सावद शाह या 28 वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे. या तरूणाला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नंदिता संकारा या पेशाने मॉडेल असलेल्या तरूणीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने सांगितलं आहे की, "मी बसने प्रवास करत असताना आरोपी माझ्या आणि एका महिलेच्या मध्ये येऊन बसला. त्यावेळी त्याच्या पँटची चैन उघडी होती. काही वेळानंतर त्याने पलीकडे बसलेल्या महिलेसोबत गैरवर्तन करायला सुरूवात केली."

"तिच्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती महिला थोडी बाजूला सरकली. पण त्याने लगेच हस्तमैथून करण्यास सुरूवात केली. हे पाहून मी त्याच्यावर खूप रागावले होते. पण या महिलेने अलार्म वाजवल्यानंतर आरोपीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण बस चालक आणि वाहकाने त्याला धरून ठेवले आणि काही वेळाने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले." असं तरूणीने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT