Crypto Currency Sakal Digital
Union Budget 2026 Updates

क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करताय? वाचा अर्थसंकल्पातील महत्त्वाची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : जर तुम्हाला क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला डिजिटल मालमत्ता आणि क्रिप्टोकरन्सीवरील (Crypto Curreny) हा मोठा बदल माहित असणे आवश्यक आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Budget 2022) यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये सरकारने क्रिप्टो करन्सी कराच्या कक्षेत आणण्याची घोषणा सीतारामन यांनी केली आहे.

क्रिप्टो करन्सीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर ३० टक्के कर आकारला जाईल. या ३० टक्के कराव्यतिरिक्त, अर्थमंत्र्यांनी डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणावरही ३० टक्के कर आकारला जाईल, अशी घोषणा केली. एका मर्यादेपेक्षा जास्त डिजिटल मालमत्तेचे हस्तांतरण केल्यास एक टक्का टीडीएस मिळेल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर भेटवस्तू म्हणून मिळालेल्या डिजिटल मालमत्तेवरही कर आकारला जाईल, असंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे.

क्रिप्टोकरन्सी बिल नाही -

डिसेंबर 2021 मध्ये संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी, सरकार क्रिप्टो करन्सी आणि अधिकृत डिजिटल चलन नियमन विधेयक २०२१ असं विधेयक आणतील, अशी चर्चा होती. मात्र, त्याबाबत अनेक बाबींवर अजूनही चर्चा सुरू आहे, असं सरकारने स्पष्ट केलं होतं. आता सरकारने थेट क्रिप्टो कराच्या कक्षेत आणले आहे. त्यामुळे आता क्रिप्टो गुंतवणुकीवर काय परिणाम होतो? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT