Dhule Court esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : विशेष लोकअदालतीत 19 प्रकरणे निकाली; वाहन अपघात प्रकरणांत 38 लाख नुकसानभरपाई

सकाळ वृत्तसेवा

धुळे : महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशाने रविवारी (ता. २६) धुळे जिल्हा न्यायालयात झालेल्या विशेष लोकअदालतीत एकूण १९ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली. या लोकअदालतीत वाहन अपघात प्रकरणात एकूण ३८ लाख ४४ हजार ९२६ रुपये नुकसानभरपाई तथा वसुली झाली.

धुळे जिल्हा न्यायालय विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. लोकअदालतीमध्ये मोटार अपघात, कौटुंबिक व भूसंपादनाचे न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली. दाखल प्रकरणांपैकी एकूण ५७ प्रकरणे विशेष लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली. त्यांपैकी एकूण १९ प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली.

या लोकअदालतमध्ये ३८ लाख ४४ हजार ९२६ रुपयांची नुकसानभरपाई व वसुली झाली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रभारी मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एच. मोहम्मद यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत झाली.

लोकअदालतीसाठी धुळे जिल्हा वकील संघ तसेच तालुका वकील संघ, पक्षकार, पोलिस आदींनी सहकार्य केले, अशी माहिती धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश संदीप वि. स्वामी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT