Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : प्रशासनाकडून अवैध गौणखनिज वाहनचालकांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शिंदखेडा तालुक्यात अवैध (Illegal) गौणखनिजाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र, आता याला काही प्रमाणात लगाम घालण्यात येत आहे.

महसूल विभागाने २३ मार्चला वाळू व खडीची अवैधरीत्या वाहतूक करणारे पाच डंपर पकडून त्यांना पाच लाख ८६ हजार दंडाची नोटीस बजावली आहे. (Administration takes action against illegal minor mineral vehicle drivers dhule crime news)

२३ मार्चला दुपारी एक ते दीडच्या सुमारास गुजरात राज्यातील तापी नदीतून वाळू वाहतूक करून नेत असताना तीन डंपर ( एमएच १८ बीजी ९४२०, एमएच १८ बीजी ९४१८, एमएच १८-९४१६) आढळून आले.

या डंपरचालकांकडे वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता. तीनही डंपर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. डंपरमध्ये प्रत्येकी दोन ब्रास वाळू अतिरिक्त आढळली.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

दुसऱ्या एका कारवाईत अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रथमेश घोलप यांनी बाभळे फाट्यावर २३ मार्चला दोन डंपरवर कारवाई केली.

महसूल विभागाने एकाच दिवशी पाच वाहनांवर कारवाई करून त्यांना दंड भरण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. पाचही वाहनांना एकूण पाच लाख ८६ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT