उत्तर महाराष्ट्र

निमगूळ गावात एकाच दिवशी सात जणांचा कोरोनाने मृत्यू 

विजय बागल

निमगूळ: शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ गावात कोरोनाने थैमान घातले असून निमगुळ गावात 20 दिवसात 206 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 56 रुग्ण बरे झाले असून ज्यांनी निमगूळ आरोग्य केंद्रात रॅपिड टेस्ट केलेले तीन रुग्ण कोरोनाने दगावले आहेत. त्या व्यतिरिक्त 20 दिवसात जवळपास 22 जण दगावले असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

त्यात एकाच दिवसांत 7 जणांचा मृत्यू झाल्याने गावासाठी धक्का देणारा दिवस ठरला आहे. त्यामुळे गावात खळबळ माजली असून या सर्व परिस्थितीत आरोग्य यंत्रणाने अधिक सक्रियपणे काम करण्याची आवश्यकता असल्याची मागणी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केल्यानंतर आज प्रशासन गतिमानतेने कामाला लागले आहे. 

संपूर्ण गाव भयभीत..
कोरोनाने नवीन निमगुळ गावात हाहाकार माजवला असून संपूर्ण गाव यामुळे भयभीत झाले गावाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर होत आहे. डॉ. हितेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. साक्षी कुवर व कर्मचारी वर्ग अथक परिश्रम घेत आहे अश्या पार्श्वभूमीवर निमगुळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर त्याचा मोठा ताण पडत असून ती यंत्रणा कमी पडत असल्याची तक्रार आमदार रावल यांच्या कडे करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्याना त्याबाबत माहिती दिली व जिल्हा प्रशासनाने यात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यानी प्रांताधिकारी विक्रम बांदल व जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष नवले यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले असून गावातील परिस्थितीतचा आढावा घेतला प्रांताधिकारी विक्रमसिह बादल म्हणाले कि  आजपासून आरोग्य केंद्रातच आर टी पी सी आर टेस्ट करणार असून वय 45 च्या वरील वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच दोंडाईचा येथील कामगार भुवन ताब्यात घेतले असून 50 बेडचे ऑक्सिजन युक्त कोरोना सेंटर तयार करणार असल्याचे सांगितले.

संपूर्ण गावात तपासणी मोहिम

गावातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील ते लक्षात घेवून गावात प्रत्येक घरात तपासणी मोहीम राबविणे, टेस्टींग वाढवणे, ट्रेसिंग वाढवणे, वेळोवेळी गाव सॅनेटराईज करण्याच्या सूचना दिल्या दरम्यान नागरिकांनी तहसीलदार सुनील बैसाने यांना कोरोना सेंटर निमगूळ गावातच उभारण्याची मागणी केली आढावा बैठकीला तहसीलदार सुनील बैसाने विस्तार अधिकारी संजय सोनवणे तालुका वैद्यकीय अधिकारी भूषण मोरे उपस्थित होते.

,संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT