While giving statement to Collector Abhinav Goyal, Adv. Prakash Patil and Zilla Parishad Member Lalit Warude. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : पीकविमा कंपनीची रक्कम देण्याबाबत हेराफेरी : ॲड. प्रकाश पाटील

Dhule News : धुळे जिल्ह्यातील शेतकरी रब्बी २०२२-२३ मध्ये पीक कापणी प्रयोगावर आधारित नऊ कोटी ७६ ला एवढी नुकसानभरपाईसाठी पात्र होते.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : धुळे जिल्ह्यातील शेतकरी रब्बी २०२२-२३ मध्ये पीक कापणी प्रयोगावर आधारित नऊ कोटी ७६ ला एवढी नुकसानभरपाईसाठी पात्र होते. विमा कंपनीने जवळपास ७६ लाखांची किरकोळ नुकसानभरपाई वितरित केली. शिंदखेडा तालुक्यातील बेटावद, नरडाणा व वर्षी या महसुली मंडळांत नऊ कोटी देय होते.

त्याबाबतीत कंपनीने मौन बाळगले. विशेष म्हणजे पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीत हेराफेरी केल्याचा आरोप विमातज्ज्ञ तथा कृषिभूषण अॅड. प्रकाश पाटील यांनी केला आहे.

कृषिभूषण अॅड. पाटील यांनी पीकविमा कंपनीच्या हेराफेरीबाबत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन दिले. निवेदनात नमूद केले आहे, की पीकविम्याची उंबरठा उत्पादनावर आधारित नुकसानभरपाई दिली जाते.

त्याची आकडेवारी फक्त विमा कंपनीकडे आहे. परिणामी नुकसानभरपाई देय आहे किंवा नाही, हे शेतकऱ्यांना समजत नाही. याचाच फायदा विमा कंपनी घेत आहे, तर कृषी खात्याचे याकडे दुर्लक्ष आहे.

याबाबतीत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी भ्रमणध्वनी न उचलणे, वेगळीच माहिती देणे, टाळाटाळ करणे आदींवरून हेराफरीचा संशय वाढलाय. चौकशीतून विमा कंपनीने कृषी विभागाकडून माहिती मागविली.

विभागानेसुद्धा जुनीच माहिती पाठविली. कंपनीने कृषी विभागाशी कोणताही संपर्क साधला नाही. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला आजही काहीच माहिती नाही. याबाबत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी

जिल्हा पीकविमा तक्रार निवारण समितीची बैठक बोलावावी. पीक कापणीची तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व विमा कंपनी पातळीवरील आकडेवारी मागवून प्रत्यक्ष पाहणी करावी. बैठकीसाठी जबाबदार विमा कंपनी प्रतिनिधीला बोलवून सोक्षमोक्ष लावावा.

पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी. नुकसानभरपाई मार्गदर्शक सूचनेनुसार १२ टक्के व्याजदराने द्यावी, अशी मागणी अॅड. पाटील, जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे व कृषिभूषण वाल्मीक पाटील यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खान सर यांच्या कोचिंग सेंटरबाहेर गोळीबार, ८ ते १० राउंड फायर; सुरक्षा रक्षक जखमी, कुणी केला हल्ला?

US Iran Conflict : शांतता करार होणार नाही? इराण-अमेरिका संघर्ष पुन्हा पेटला; क्षेपणास्त्र हल्ल्यांनी खळबळ

Farmer Loan Waiver: कर्जमाफीवर शिक्कामोर्तब! ५५ लाख शेतकऱ्यांना ३६,५८५ कोटींचा मिळणार लाभ; मात्र काय आहेत योजनेचे प्रमुख निकष-अटी

Satara Accident: उज्ज्वल भविष्याची स्वप्ने अधुरी! दुचाकी अपघातात शिरवळच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, कॉलेज प्रवेशाची माहिती घेऊन परतताना काळाचा घाला

आजचे राशिभविष्य - 03 जून 2026

SCROLL FOR NEXT